Jammu Kashmir: जम्मूला रवाना झालेले बीएसएफचे 10 जवान बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 10:18 AM2018-06-28T10:18:15+5:302018-06-28T12:02:57+5:30

पश्चिम बंगालमधील मुर्शीदाबाद येथून जम्मूला जाणारे बीएसएफचे दहा जवान बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेले जवान 83 व्या बटालियनमध्ये तैनात होते. तसेच, लष्कराच्या स्पेशल ट्रेनिंगमधून बाहेर पडले होते. 

Jammu Kashmir : ten bsf army corps missing from train, officers lodge FIR | Jammu Kashmir: जम्मूला रवाना झालेले बीएसएफचे 10 जवान बेपत्ता

Jammu Kashmir: जम्मूला रवाना झालेले बीएसएफचे 10 जवान बेपत्ता

googlenewsNext
ठळक मुद्देजम्मूला जाणारे बीएसएफचे दहा जवान बेपत्ता वर्धमान आणि धनबाद रेल्वे स्टेशनच्यादरम्यान हे जवान बेपत्ताजीआरपीमध्ये जवान बेपत्ता झाले असल्याची तक्रार

मुगलसराय : पश्चिम बंगालमधील मुर्शीदाबाद येथून जम्मूला जाणारे बीएसएफचे दहा जवान बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेले जवान 83 व्या बटालियनमध्ये तैनात होते. तसेच, लष्कराच्या स्पेशल ट्रेनिंगमधून बाहेर पडले होते. 

जम्मू-काश्मीरला जात असताना वर्धमान आणि धनबाद रेल्वे स्टेशनच्यादरम्यान हे जवान बेपत्ता झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर  रेल्वे उत्तरप्रदेशातील मुगलसराय पोहचली. त्यावेळी अधिका-यांनी येथील जीआरपीमध्ये जवान बेपत्ता झाले असल्याची तक्रार दाखल केली आहे.   

बीएसएफचे एसआय सुखबीर सिंह यांनी सांगितले की, धनबाद स्टेशनवरून रेल्वे निघाल्यानंतर जवानांची गणती करण्यात आली. त्यावेळी दहा जवान गायब झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देण्यात आल्या. त्यावर अधिकाऱ्यांनी जवान हरवल्याची तक्रार नोंदवण्याचे निर्देश दिले, असे त्यांनी सांगितले. 

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादवरून 83व्या बटालियनच्या बीएसएफ जवानांना घेऊन लष्कराची विशेष रेल्वेने जम्मूकडे निघाले होते. या दरम्यान ही रेल्वे वर्धमान आणि धनबाद स्टेशन दरम्यान थांबली होती. तिथूनच ते गायब झाले असावेत, असे सुखबीर सिंह यांनी सांगितले
 

Web Title: Jammu Kashmir : ten bsf army corps missing from train, officers lodge FIR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.