हाच तो क्रूरकर्मा... जैश-ए-मोहम्मदने दाखवला आत्मघातकी स्फोट घडवणाऱ्याचा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 05:15 PM2019-02-14T17:15:12+5:302019-02-14T17:22:02+5:30

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा जवानांवर हल्ला केला आहे. त्यानंतर आता जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

Jaish-e-Mohammad showed photo of a self-inflicted blast in pulwama kashmir | हाच तो क्रूरकर्मा... जैश-ए-मोहम्मदने दाखवला आत्मघातकी स्फोट घडवणाऱ्याचा फोटो!

हाच तो क्रूरकर्मा... जैश-ए-मोहम्मदने दाखवला आत्मघातकी स्फोट घडवणाऱ्याचा फोटो!

googlenewsNext

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 18 जवान शहीद झाले आहेत. जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला घडवून आणला आहे. या हल्ल्यामागील सुत्रधार दहशतवाद्याचे छायाचित्र जारी करण्यात आले आहे. आदिल अहमद असे याचे नाव असून त्याच्या छायाचित्रावर जैश-ए-मोहम्मद लिहिण्यात आले आहे.  

काश्मीरमध्ये CRPFच्या ताफ्यावर मोठा दहशतवाद्यांचा हल्ला; आयईडीच्या स्फोटात 12 जवान शहीद

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा जवानांवर हल्ला केला आहे. त्यानंतर आता जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. पुलवाम्यातील अवंतीपुराजवळच्या गोरीपोरा भागात सुरक्षा जवानांच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी एकत्रित हल्ला चढवला. जवानांची बस ज्या रस्त्यावरून जाणार होती, त्या ठिकाणी एका कारमध्ये दहशतवाद्यांनी आयईडी बॉम्ब ठेवला होता. जवानांची बस त्या उभा असलेल्या गाडीजवळ येतात त्या कारचा स्फोट झाला. या हल्ल्यात 18 जवान शहीद झाल्याची माहिती आहे. जवानांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, जखमींवर उपचार सुरू आहेत. या हल्ल्याचा मुख्य सुत्रधार आदिल अहमद याचे छायाचित्र जारी करण्यात आले आहे. 

सीआरपीएफच्या माहितीनुसार, रस्त्यावर एका चारचाकी गाडीमध्ये IED बॉम्ब ठेवण्यात आला होता. कार महामार्गावर उभी होती. सुरक्षा जवानांच्या गाडीचा ताफा त्या कारजवळ आल्यानंतर लागलीच या कारमधली बॉम्बचा स्फोट झाला. त्यानंतर सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांकडून गोळीबारही करण्यात आला. या हल्ल्यात 18 जवान शहीद झाले असून, 20 हून अधिक जवान जखमी आहेत. दरम्यान, 2004 नंतर जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हा एवढा मोठा हल्ला घडवला आहे. उरीनंतरचा हा भारतावरचा सर्वात मोठा हल्ला असल्याचं मानलं जात आहे.  




 

Web Title: Jaish-e-Mohammad showed photo of a self-inflicted blast in pulwama kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.