आयटीबीपीच्या जवानांची बस दरीत कोसळली; एकाचा मृत्यू, 24 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 10:46 AM2018-12-24T10:46:39+5:302018-12-24T10:47:24+5:30

जम्मू- श्रीनगर महामार्गावरील रामबन जिल्ह्यातील खूनी नाला येथे हा अपघात झाला.

ITBP troops bus crashed in valley; One killed, 24 injured | आयटीबीपीच्या जवानांची बस दरीत कोसळली; एकाचा मृत्यू, 24 जखमी

आयटीबीपीच्या जवानांची बस दरीत कोसळली; एकाचा मृत्यू, 24 जखमी

Next

जम्मू : आयटीबीपीच्या जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळल्याने एका जवानाचा मृत्यू झाला असून 24 जण गंभीर जखमी झाले आहेत .


जम्मू- श्रीनगर महामार्गावरील रामबन जिल्ह्यातील खूनी नाला येथे हा अपघात झाला. इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीसच्या जखमी जवानांना हेलिकॉप्टरद्वारे रुग्णालयात हलविण्यात आले असून या बसमधून 35 जण प्रवास करत होते, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 



जखमी जवानांना जिल्हा इस्पितळात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहे. 



 

Web Title: ITBP troops bus crashed in valley; One killed, 24 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.