डोकलाम विवाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी व क्षी जिनपिंग यांच्या बैठकीत असा निघाला वादावर तोडगा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2017 07:09 PM2017-09-30T19:09:13+5:302017-09-30T23:13:10+5:30

हॅम्बर्गमध्ये जी 20 संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात झालेल्या भेटीदरम्यान डोकलाम विवाद सोडण्यावर चर्चा झाली होती.

it was modi and xi jinping meeting which resolve the doklam issue | डोकलाम विवाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी व क्षी जिनपिंग यांच्या बैठकीत असा निघाला वादावर तोडगा 

डोकलाम विवाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी व क्षी जिनपिंग यांच्या बैठकीत असा निघाला वादावर तोडगा 

Next

नवी दिल्ली - हॅम्बर्गमध्ये जी 20 संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात झालेल्या भेटीदरम्यान डोकलाम विवाद सोडण्यावर चर्चा झाली होती. याचा खुलासा एका नवीन पुस्तकात करण्यात आला होता. धोरणात्मक बाबींचे अभ्यासक नितीन ए. गोखले यांनी  'सिक्यॉरिंग इंडिया द मोदी वे' नावाच्या पुस्तकात केला आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते शुक्रवारी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात गोखले यांनी लिहिले आहे की, जी 20 संमेलनादरम्यान मोदी क्षी जिनपिंग यांच्याकडे स्वतःहून गेल्यानंतर बैठक झाली होती.   

पुस्तकात देण्यात आलेल्या माहितीनुसार, या बैठकीचे साक्षीदार असलेल्या भारतीय राजदूत अधिका-यांनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्षी जिनपिंग यांच्यासोबत अघोषित बैठक घेतल्यामुळे चीनचे सदस्य मंडळ आश्चर्यचकित झाले. या बैठकीदरम्यान मोदी यांनी क्षी जिनपिंग यांना सल्ला दिला की भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि स्टेट सल्लागार यांग जीची यांना डोकलाम विवादावर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली पाहिजे. यावेळी मोदींनी क्षी जिनपिंग यांना सांगितले की, आपले धोरणात्मक संबंध डोकलामसारख्या मुद्याहून अधिक मोठे आहेत. 

या भेटीनंतर 15 दिवसांनंतर, डोवाल प्रस्तावित ब्रिक्स एनएसए बैठकीसाठी रवाना झाला होते. यादरम्यान, भारतानं राजदूत विजय गोखले यांच्या नेतृत्वात चीनमध्ये 38 बैठका घेतल्या. यावेळी भारतीय सदस्य दलाला यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, एनएसए डोवाल यांच्याकडून स्पष्ट निर्देश मिळाले होते. पुस्तकातील माहितीनुसार, भारत स्वतःच्या बाजूनं ठोस भूमिकेत राहिल.'यानंतर, चीननं डोकलाम क्षेत्रात मार्गिक निर्माण करण्याचे काम थांबवण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे हा वाद निर्माण झाला होता. 

2 महिने सुरू होता लष्करी तिढा  
भारत, चीन व भूतान यांच्या सीमा जेथे मिळतात त्या डोकलाम पठारावरून भारत व चीन यांच्यात गेले दोन महिने सुरू असलेला लष्करी तिढा राजनैतिक वाटाघाटींतून सुटण्याचा मार्ग मोकळा झाला असून,त्यानुसार भारताने त्या ठिकाणाहून आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली . चीनमधील ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने  ही घोषणा केली होती. सैन्याची ही माघार उभयपक्षी सहमतीने होत असल्याचे भारताने म्हटले असले तरी चीनने मात्र भारताने एकतर्फी सैन्य मागे घेतल्याचा दावा केला. भारतीय लष्कराच्या सूत्रांनी याविषयी अधिक तपशील देण्यास नकार दिला. मात्र सैन्य माघारी घेण्यावर सहमती झाली आहे व त्यानुसार सैन्य मागे घेतले जात आहे, यास या सूत्रांनी दुजोरा दिला होता. बीजिंगमध्ये चीनचे परराष्ट्र मंत्रालय, ‘पीपल्स डेली’ व ‘शिन्हुआ’ वृत्तसंस्था तसेच चायना ग्लोबल टेलिव्हिजन या सर्वांनी डोकलामचा तिढा सोडवण्यावर द्विपक्षीय सहमती झाल्याचे जाहीर केले. मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार फक्त भारताने सैन्य मागे घेतले आहे. सोमवारी दुपारपर्यंत डोकलाम येथून भारताने आपले सर्व सैनिक व लष्करी सामग्री माघारी घेऊन सीमेपलीकडे नेल्याचे चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग म्हणाले. चीन मात्र या प्रदेशावरील आपले सार्वभौमत्व अधोरेखित करण्यासाठी तेथे सैन्य ठेवून पहारा देतच राहील, असा दावाही त्यांनी केला.

काय होता नेमका वाद?
या सीमेवर भूतानच्या मदतीसाठी भारतीय सैन्य तैनात आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानांनी भूतानच्या हद्दीत सुरू केलेले रस्त्याचे बांधकाम भारतीय सैनिकांनी हस्तक्षेप करून 18 जून रोजी बंद पाडले तेव्हापासून हा तिढा सुरू आहे. तो प्रदेश आपलाच असल्याचा दावा करून चीनने भारतावर घुसखोरीचा आरोप केला होता. तेव्हापासून भारताचे 350 व चीनचे 300 सैनिक डोकलाम पठारावर आमने-सामने आहेत.

Web Title: it was modi and xi jinping meeting which resolve the doklam issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.