स्टेट बँक आणणार इस्लामी इक्विटी फंड

By admin | Published: November 27, 2014 02:49 AM2014-11-27T02:49:24+5:302014-11-27T02:49:24+5:30

धर्मशास्त्रचे उल्लंघन न करता शेअर बाजारात गुंतवणूक करणो शक्य व्हावे, यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया पुढील महिन्यापासून एक इस्लामी इक्विटी फंड सुरू करणार आहे.

Islamic Equity Fund launches by State Bank | स्टेट बँक आणणार इस्लामी इक्विटी फंड

स्टेट बँक आणणार इस्लामी इक्विटी फंड

Next
नवे पाऊल : धर्मशास्त्रचे उल्लंघन न करता शेअर बाजारात गुंतवणूक शक्य 
नवी दिल्ली : देशातील 17 कोटी मुस्लीम नागरिकांना आपल्या धर्मशास्त्रचे उल्लंघन न करता शेअर बाजारात गुंतवणूक करणो शक्य व्हावे, यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया पुढील महिन्यापासून एक इस्लामी इक्विटी फंड सुरू करणार आहे.
बँकेच्या एका वरिष्ठ अधिका:याने ही माहिती देताना सांगितले, की हा इस्लामी इक्विटी फंड सुरू झाल्यावर सुरुवातीस त्यात एक अब्ज रुपयांची गुतवणूक होईल, अशी बँकेची अपेक्षा आहे.
‘सेक्युरिटिज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’ने (सेबी) अलीकडेच स्टेट बँकेस व अन्य तीन म्युच्युअल फंडांना ‘शरिया फंड’ म्हणून ओळखले जाणारे असे इस्लामी इक्विटी फंड सुरू करण्यास परवानगी 
दिली होती. इस्लामी धर्मशास्त्रनुसार (शरियत) व्याज देणो व घेणो निषिद्ध 
ठरविले गेले आहे. असे शरिया इक्विटी 
फंड इस्लामी नियमांनुसार कामकाज करणा:या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. भारतातील शेअर बाजारांमध्ये अशा 
प्रकारे इस्लामी पद्धतीने व्यवहार करणा:या 6क्क् ते 7क्क् कंपन्या नोंदलेल्या आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
शरियतच्या तत्त्वांनुसार चालणारा विशेष इक्विटी फंड सरकारी बँकेमार्फत सुरू करणारा इस्लामी देश वगळता भारत हा जगातील केवळ दुसरा 
देश आहे. याआधी गेल्या जूनमध्ये ब्रिटनने ‘सॉवरिन इस्लामिक बॉण्ड’ जारी केले होते.

 

Web Title: Islamic Equity Fund launches by State Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.