येत्या पाच वर्षांत 8.5 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं उद्दिष्ट्य - सुरेश प्रभू

By admin | Published: February 25, 2016 12:17 PM2016-02-25T12:17:46+5:302016-02-25T14:34:51+5:30

येत्या पाच वर्षांमध्ये भारतीय रेल्वे 8.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करेल असं सांगत भारतीय रेल्वे ही प्रत्येकासाठी गर्वाची बाब ठरेल

An investment of Rs 8.5 lakh crore in next five years - Suresh Prabhu | येत्या पाच वर्षांत 8.5 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं उद्दिष्ट्य - सुरेश प्रभू

येत्या पाच वर्षांत 8.5 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं उद्दिष्ट्य - सुरेश प्रभू

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - येत्या पाच वर्षांमध्ये भारतीय रेल्वे 8.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करेल असं सांगत भारतीय रेल्वे ही प्रत्येकासाठी गर्वाची बाब ठरेल असा आत्मविश्वास रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला. हे बजेट माझं नसून लोकांचं बजेट असल्याचं सांगत या वर्षामध्ये 1.21 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं उद्दिष्ट प्रभूंनी ठेवलं आहे.
सुरेश प्रभूंच्या बजेट सादरीकरणातील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे:
 
 
- 1 तास 15 मिनिटं सुरु असलेल्या सुरेश प्रभूंच्या भाषणातील  प्रवाशांच्या दृष्टीने निष्कर्षाच्या बाबी - फक्त चार नव्या गाडयांची घोषणा, प्रवासी आणि माल भाडयात कोणतीही वाढ नाही.
- अपघातमुक्त रेल्वेसाठी संकल्प - मिशन झीरो अॅक्सिडेंट द्वारा टक्कर रोखणारी यंत्रणा.
- दिल्ली रिंग रेल्वेवर आणखी २१ स्टेशन्स
- रेल्वेत १.५ लाख कोटी गुंतविण्यास एलआयसी तयार
- १७ हजार बायो टाॅयलेट्‌स उभारणार
- ४० टक्के जास्त प्रवासी वाहून नेण्यासाठी वातानुकूलित डबल डेकर रेल्वे
- २०१८-१९ पर्यंत रोजगार क्षमता १४ कोटी मनुष्य दिवसापर्यंत वाढवणार
- रेल्वे भरतीसाठी आॅन लाइन प्रक्रिया
- मिझोरम- त्रिपुरा ब्राॅडगेजने जोडणार
- रेल्वे कर्मचा-यांच्या स्टार्ट अप योजनेसाठी 50 कोटींचा निधी बाजूला काढला.
- डब्यांची क्षमता वाढविण्यासाठी अभ्यास करून सुधारणेवर भर देणार.
- काही गाड्यांमध्ये प्रवाशांच्या मनोरंजनासाठी एफएम सुरू करणार.
- 130 कि.मी. वेगाने धावणारी तेजस रेल्वे सुरु करणार.
- 2020 पर्यंत रेल्वेच्या अंदाजित महसूलात चार हजार कोटींची वाढ अपेक्षित आहे.
- रेल्वेच्या प्रकल्पांवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन व जीपीएस सिस्टीमचा वापर करणार.
- 139 या क्रमांकावर फोन करून तिकीट रद्द करता येणार.
- विद्युतीकरणामुळे रेल्वेचे 1300 कोटी रुपये वाचणार, ट्रेनच्या सर्व डब्ब्यात जीपीएस सुविधा असणार.
- चेन्नईमध्ये देशातील पहिले रेल्वे ऑटो हब उभारणार.
- जपान सरकारच्या मदतीने अहमदाबाद-मुंबई दरम्यान हायस्पीड पॅसेंजर कॉरिडोरची उभारणी करणार - सुरेश प्रभू.
- रेल्वे तिकीट रद्द करण्याची सेवा अधिक सुलभ.
- सीएसटी-पनवेलदरम्यान उन्नत रेल्वेमार्ग. मुंबईतील सर्व प्लॅटफॉर्मची उंची वाढवणार.
- गेल्या एका वर्षात ओव्हर ब्रिज व अंडर ब्रिज मिळून 820 पुलांचे काम पूर्ण झाले.92,714 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले 44 नवे प्रकल्प या वर्षी हाती घेणार.
- चर्चगेट- विरार एलिव्हेटेड कॉरिडोअरचं लक्ष्य.
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्यया कामाला सुरूवात.
- चर्चगेट- विरार एलिव्हेटेड कॉरिडोअरचं लक्ष्य.
- रेल्वे स्थानकावरील हमाल आता हमाल नाही, सहाय्यक होणार, त्यांना प्रशिक्षण देणार.
- दिव्यांग नागरिकांसाठी स्वतंत्र टॉयलेट्सची सोय.
- प्रत्येक प्रवर्गामध्ये महिलांसाठी 30 टक्क्यांचे आरक्षण.
- कचरा दिसल्यास तातडीने बोगीची स्वच्छता करण्याची मागणी करता येणार.
- ट्रेन प्रवासात वीम्याची सुविधा, तीर्थ क्षेत्रासाठी सुरु करणार आस्था एक्सप्रेस.
- उत्कृष्ट या डबल डेकर प्रवासी गाडीची घोषणा सुरेश प्रभूंनी केली असून त्यामुळे 40 टक्के जास्त प्रवासी प्रवास करू शकणार.
- ऊर्जा वापराची पद्धत बदलून तीन हजार कोटी रुपये वाचवण्याची योजना आहे.
- गेल्या एका वर्षात ओव्हर ब्रिज व अंडर ब्रिज मिळून 820 पुलांचे काम पूर्ण झाले.
- तान्ह्या बाळांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांसाठी आधी बुकिंग केल्यास बेबीफूड आणि चिल्ड्रन्स मेन्यू देणार. मुलांचे डायपर चेंज करण्यासाठी टेबल मिळणार.
- 124 खासदारांनी रेल्वे सुधारणा कार्यक्रमासाठी निधी दिला.
- श्रीनगरला रेल्वे मार्गाने जोडणार. तिकीटांच्या रांगा कमी करण्याचा प्रयत्न करणार.
- कोकण रेल्वे मार्गावर वृद्ध आणि विकलांगासाठी सारथी सेवा सुरु केली, आणखीं काही स्थानकांवर सुरु करणार.
- ई-तिकिटं बुक करण्याची क्षमता प्रति मिनिट 2000 वरून 7000 इतकी वाढवण्यात आली आहे.
- स्थानकांवर 2500 वॉटर व्हेंडिंग मशीन्स बसवणार.
- व्यस्ततम मार्गावर डबल डेकर उदय एक्सप्रेस चालवणार.
- महिलांसाठी 24 तास हेल्पलाईन क्रमांक 182 , कोणत्याही क्षणी मिळणार मदत.
- भोपाळमधील हबीबगंज रेल्वे स्टेशन देशातलं पहिले मॉडेल स्टेशन बनणार. बडोद्यात रेल्वे विद्यापीठ उभारणार.
- सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुपरफास्ट अंत्योदय एक्सप्रेस चालवणार.
- लवकरच बार-कोड तिकिट्स आणणार.
- या वर्षी रेल्वेचे महसुली उत्पन्न 1,84,820 कोटी रुपये होईल अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षीचे 18,720 कोटी रुपये शिल्लक आहेत, तर यंदा 1.21 लाख कोटी रुपयांच्या भाडवली खर्चाचे उद्दिष्ट्य.
- जगातील पहिले बायोव्हॅक्युम टॉयलेट रेल्वेने विकसित केले आणि बिबरुगड राजधानी एक्सप्रेसमध्ये त्याचा वापर केला.
- मेक इन इंडियाअंतर्गत रेल्वेचे दोन कारखाने सुरू होणार. सर्व प्रमुख स्थानकांवर सीसीटीव्ही बसवण्यात येणार.
- रेल्वेचा कुठलाही अपघात किंवा जिवीतहानीमुळे मला प्रचंड दु:ख होते.
- मेक इन इंडियाच्या माध्यमातून रेल्वेमध्ये 40 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट्य.
- जनरल बोगीमध्येही मोबाईल चार्जिंगची सुविधा होणार उपलब्ध. 2020 पर्यंत वेटिंग लिस्ट संपुष्टात आणणार.
- रेल्वे स्थानकावरील भिंती चित्राच्या माध्यमातून सामाजिक जागृती करण्यात येतेय.
- महिला व वृद्धांसाठी लोअर बर्थमध्ये विशेष कोटा.
- प्रवासी वाहतुकीवरील दरात देण्यात आलेल्या सवलतीमुळे 30 हजार कोटींचा तोटा.
- यंदाच्या वर्षी आम्ही 100 रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सुविधा सुरु केली, पुढ्च्या दोन वर्षात 400 रेल्वे स्थानकांवर वाय-फायची सुविधा देणार.
- वाराणसी-नवी दिल्ली नवी रेल्वे सेवा सुरू करणार.
- रेल्वे आणि सर्वसामान्य प्रवाशांमध्ये आज कुठलाही अडथळा नाही.
- रेल्वेच्या 1600 किमी मार्गाचे विद्युतीकरण झाले, पुढच्यावर्षीपर्यंत 2000 किमी मार्गाचे विद्युतीकरण करण्याची योजना आहे.
- बिहारसह पूर्वेकडील राज्यातील लोकांना रोजगार देणार.
- मुंबई उपनगरीय रेल्वे रोज 74 लाख प्रवाशांची वाहतूक करते, ही संख्या दिल्ली मेट्रोच्या तिप्पट आहे.
- सर्वसामान्य माणसाला डोळयासमोर ठेऊन आम्ही आमच्या योजना आखतो.
मुंबई उपनगरीय रेल्वे रोज 74 लाख प्रवाशांची वाहतूक करते, ही संख्या दिल्ली मेट्रोच्या तिप्पट आहे.
- सर्वसामान्य माणसाला डोळयासमोर ठेऊन आम्ही आमच्या योजना आखतो.
- जालंधर-उधमपूर मार्गाचे काम वेगाने सुरू आहे.
- रेल्वेच्या कारभारात 100 टक्के पारदर्शकता आणण्याची आमची मोहिम आहे, सोशल मिडीयाची यामध्ये आम्हाला मदत होत आहे.
- रेल्वेच्या विद्युतीकरमाच्या खर्चामध्ये यंदा 50 टक्के वाढ करण्यात येणार. असून पुढील वर्षीपर्यंत 20 हजार किलोमीटर मार्गाचं विद्युतीकरण झालेलं असेल.
- 2020 पर्यंत वेटिंग लिस्ट संपुष्टात, 95 टक्के गाड्या वेळेवर धावतील यासाठी आमचे प्रयत्न.
- या आर्थिक वर्षात इंधन बचतीच्या माध्यमातून 8720 कोटी रुपये वाचवण्याचे लक्ष्य.
- रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी पुढच्या पाचवर्षात 8.5 लाख कोटी रुपये खर्च करणार.
- यंदा रेल्वेच्या महसूलात 10 टक्के वाढ होण्याची शक्यता.
- यंदा आम्हाला 1 लाख 84 हजार कोटींच्या महसूलाची अपेक्षा आहे.
- यंदा रेल्वेतील गुंतवणूक दुप्पट होईल.
- मागच्यावर्षी रेल्वे अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांपैकी 139 घोषणांची अंमलबजावणी करण्यात आली.
- जगभरात मंदी असताना रेल्वेच उत्पन्न वाढवून रेल्वे नफ्यात आणण्याचा आमचा प्रयत्न.
- मालवाहतूक दरात वाढ करुन प्रवासी वाहतूकीचा तोटा भरुन काढणार.
- या वर्षी 1.21 लाख कोटी रुपयांचा भांडवली खर्च रेल्वे करणार आहे.
- गेल्या वर्षातील बचत झालेले 8,720 कोटी रुपये यावर्षी उपयोगात आणण्यात येतील.
- भारतीय रेल्वेच्या रूळांची लांबी मोजली तर ती 1.08 लाख किलोमीटर आहे, जी पृथ्वीच्या परीघापेक्षा अडीचपट आहे.
- रेल्वे अर्थसंकल्प हे व्यवहाराचं गणित नव्हे तर अपेक्षांचं प्रतीक.
- रेल्वेची कर्मचारी संख्या 13,07109 आहे, भारतीय सैन्यदलांतील संख्या 13 लाख आहे. यावरून रेल्वेची व्याप्ती लक्षात येते.
- भारतीय रेल्वे स्वच्छ भारत योजनेमध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे आणि याचा मला आनंद आहे.
- येत्या पाच वर्षांमध्ये रेल्वेमध्ये 8.5 लाख कोटीं रुपयांच्या गुंतवणुकीचं उद्दिष्ट - प्रभू
- रेल्वे देशाला जोडण्याचे काम करते, आम्ही थांबणार नाही, झुकणार नाही.
- देशाला जोडण्याचं काम रेल्वे करत आहे.
- हे बजेट माझं नव्हे तर सर्व देशाचं.
 
 
 
 
 

Web Title: An investment of Rs 8.5 lakh crore in next five years - Suresh Prabhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.