इंडोनेशिया : ज्वालामुखी फुटण्याच्या भीतीने दीड लाख लोकांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 01:46 AM2017-11-28T01:46:59+5:302017-11-28T01:47:18+5:30

Indonesia: Shifting 1.5 million people due to volcanic eruptions | इंडोनेशिया : ज्वालामुखी फुटण्याच्या भीतीने दीड लाख लोकांचे स्थलांतर

इंडोनेशिया : ज्वालामुखी फुटण्याच्या भीतीने दीड लाख लोकांचे स्थलांतर

Next

 करांगासेम (इंडोनेशिया) : इंडोनेशियात बाली येथे रिसॉर्ट बेटावर एक ज्वालामुखी कधीही फुटू शकतो, असा इशारा अधिकाºयांनी दिल्यानंतर अनेक नागरिकांनी स्थलांतर केले आहे. ४० हजार लोक घाबरून घर सोडून गेले आहेत, तर १ लाख लोकांना येथून नाइलाजास्तव बाहेर पडावे लागत आहे.
ज्वालामुखी फुटण्याच्या इशाºयानंतर स्थानिक लोकात प्रचंड भीती असून पर्यटक असहाय्य स्थितीत फसले आहेत. माउट आगुंग येथे गत आठवड्यापासून राखाडी रंगाचा धूर निघत आहे. आता तो तीन किमी उंचीपर्यंत निघत आहे. त्यामुळे विमानांचे उड्डाण करणेही अवघड झाले आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन बोर्डाने सांगितले की, ज्वालामुखीतून सातत्याने राख निघत असून, स्फोटाचे आवाजही येत आहेत. आग रात्रीच्या वेळी वाढत असून हे स्पष्ट दिसत आहे की, संभावित ज्वालामुखी स्फोट लवकरच होईल.
माउंट आगुंगमध्ये सप्टेंबरपासून गडगडाट होत आहे. या परिसरात राहणाºया १,४०,००० लोकांना येथून बाहेर पडावे लागले आहे. आॅक्टोबरपासून ज्वालामुखीची सक्रियता कमी झाल्याने काही लोक परतले होते. मात्र, शनिवारपासून पुन्हा ज्वालामुखीतून आवाज येत आहेत.

Web Title: Indonesia: Shifting 1.5 million people due to volcanic eruptions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Earthपृथ्वी