विदेशी गुंतवणूकदारांची भारताला दुसरी पसंती

By admin | Published: November 27, 2014 01:39 AM2014-11-27T01:39:11+5:302014-11-27T01:39:11+5:30

शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या दृष्टीने भारत आशियातील दुस:या क्रमांकाची पसंती ठरला आहे.

India's second choice for foreign investors | विदेशी गुंतवणूकदारांची भारताला दुसरी पसंती

विदेशी गुंतवणूकदारांची भारताला दुसरी पसंती

Next
नवी दिल्ली : शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या दृष्टीने भारत आशियातील दुस:या क्रमांकाची पसंती ठरला आहे. नोव्हेंबरमध्ये आशियात झालेल्या विदेशी गुंतवणुकीच्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. 
जागतिक वित्त संस्थांच्या विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे. विदेशी संस्थांनी आशियात नोव्हेंबरमध्ये 5.3 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. त्यातील 1.4 अब्ज डॉलरची गुंतवणूक भारतात झाली आहे. एचएसबीसीच्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. आशियाई अर्थव्यवस्थांत चीनने आपले अव्वल स्थान पुन्हा प्राप्त करून भारताला दुस:या स्थानी ढकलले आहे. तिस:या स्थानी थायलंड
आहे. 
24 नोव्हेंबर्पयतची ही आकडेवारी आहे. आशियातील सर्व बाजारांत एकूण 5.3 अब्ज डॉलरचा अर्थप्रवाह दिसून आला. त्यातील भारत आणि तैवानचा वाटा अनुक्रमे 1.4 अब्ज डॉलर आणि 1.3 अब्ज डॉलर आहे. यंदाच्या वर्षात आशियायी शेअर बाजारांत एकूण 28.7 अब्ज डॉलरची संस्थात्मक गुंतवणूक झाली. एचएसबीसीने म्हटले की, इंडोनेशिया, चीन आणि भारतात अपेक्षेपेक्षा चांगली गुंतवणूक दिसून आली. या उलट हाँगकाँग, थायलंड आणि मलेशिया येथे अपेक्षेपेक्षा कमी गुंतवणूक प्रवाह दिसून आला.  विभागनिहाय विश्लेषण केल्यास असे दिसून आले की, औद्योगिक, वस्तू आणि ग्राहक क्षेत्रत चांगली गुंतवणूक दिसून आली. टेलिकॉम आणि वित्तीय क्षेत्रत मात्र सर्वात कमी गुंतवणूक पाहायला मिळाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)

 

Web Title: India's second choice for foreign investors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.