Indian Railway: काही रेल्वे स्टेशनच्या नावामागे ‘रोड’ का लिहितात? असं आहे खास कारण   

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 11:58 AM2023-12-13T11:58:25+5:302023-12-13T11:59:08+5:30

Indian Railway:भारतीय रेल्वे हे भारतातील प्रवासाचे लोकप्रिय साधन आहे. रेल्वे स्टेशनच्या नावांमागे जंक्शन, टर्मिनल आणि रोड शब्द लावलेले तुम्हीही पाहिले असेल. रेल्वे स्टेशनच्या नावांमागे हे शब्द का लावले जातात, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?

Indian Railway: Why write 'road' after the name of some railway stations? This is a special reason | Indian Railway: काही रेल्वे स्टेशनच्या नावामागे ‘रोड’ का लिहितात? असं आहे खास कारण   

Indian Railway: काही रेल्वे स्टेशनच्या नावामागे ‘रोड’ का लिहितात? असं आहे खास कारण   

भारतीय रेल्वे हे भारतातील प्रवासाचे लोकप्रिय साधन आहे. रेल्वे स्टेशनच्या नावांमागे जंक्शन, टर्मिनल आणि रोड शब्द लावलेले तुम्हीही पाहिले असेल. रेल्वे स्टेशनच्या नावांमागे हे शब्द का लावले जातात, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? खरंतर प्रवाशांना काही खास माहिती देण्यासाठी या शब्दांचा वापर केला जातो. रेल्वे स्टेशनच्या नावामागे जोडला जाणारा रोड हा शब्द स्टेशनबाबत काही खास माहिती देतो. हा शब्द प्रवाशांना सूचित करतो की, हे स्टेशन शहरामध्ये नाही तर मुख्य शहरापासून काही अंतरावर स्थित आहे. हे अंतर २ किमी ते १०० किमीपर्यंत असू शकतं.

त्यामुळे तुम्ही जेव्हा स्टेशनच्या नावामागे रोड लावलेलं असतं, अशा स्टेशनांवर उतराल तेव्हा तुम्हाला त्या स्टेशनवर उतरून मुख्य शहरात जाण्यासाठी वाहतुकीच्या अन्य साधनाची मदत घ्यावी लागेल हे लक्षात ठेवा. रेल्वे स्टेशनच्या नावामागे जोडलेला रोड शब्द हा त्या रेल्वेस्टेशनवरून संबंधित शहराकडे जाण्यासाठी एक रोड (रस्ता) जातो. तेव्हा त्या शहरात जाणाऱ्या प्रवाशांनी त्या रेल्वे स्टेशनवर उतरावं, असं दर्शवतो.

रोड नाव असलेल्या रेल्वे स्टेशनपासून शहराचं अंतर हे २-३ किलोमीटरपासून ते १०० किलोमीटरपर्यंत असते. जसं की वसई रोड रेल्वेस्टेशन वसईपासून २ किमी अंतरावर आहे. तर सावंतवाडी रोड रेल्वेस्टेशन सावंतवाडी शहरापासून साडे सात किलोमीटर अंतरावर आहे. तर कोडाई कॅनॉल रेल्वेस्टेशनपासून कोडाईकॅनॉल शहर हे तब्बल ७९ किमी दूर अंतरावर आहे. रांची रोड रेल्वेस्टेशन रांचीपासून ४९ किमी अंतरावर तर मात्र आता अनेक रेल्वेस्टेशनजवळ लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पण जेव्हा ही स्टेशन बांधण्यात आली, तेव्हा तिथे लोकवस्ती विरळ होती.

अनेक शहरांपर्यंत रेल्वेमार्ग नेण्यात अडथळा आल्याने या शहरांपासून काही अंतरावर रेल्वेस्टेशन बांधण्यात आली आहेत. त्यासाठी माऊंट आबूचं उदाहरण घेता येईल. माऊंट आबू पर्वतावर रेल्वेलाइन पसरवणं अत्यंत खर्चिक होतं, त्यामुळे आबूपासून २७ किमी अंतरावर पर्वताखाली रेल्वेस्टेशन बांधण्यात आले.  

Web Title: Indian Railway: Why write 'road' after the name of some railway stations? This is a special reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.