Indian Air Strike on Pakistan: पाकिस्तानी सेनाधिकाऱ्यांची ट्विटरवर यथेच्छ चेष्टा...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 05:22 PM2019-02-26T17:22:53+5:302019-02-26T17:23:29+5:30

ट्विटरवर अ‍ॅक्टिव्ह झालेल्या देशप्रेमी भारतीयांनी मेजर जनरल असिफ गफुर यांची चांगलीच कोंडी केल्याचे दिसून येत आहे. 

Indian Air Strike on Pakistan: twitter handler attack on Major General Asif Ghafoor | Indian Air Strike on Pakistan: पाकिस्तानी सेनाधिकाऱ्यांची ट्विटरवर यथेच्छ चेष्टा...

Indian Air Strike on Pakistan: पाकिस्तानी सेनाधिकाऱ्यांची ट्विटरवर यथेच्छ चेष्टा...

Next
ठळक मुद्देभारतीय वायु सेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे.दहशवाद्यांवर कारवाई करताना भारतीय वायुसेनेने पाकिस्तानला मोठा चकवा दिला आहे.भारतीय वायु सेनेच्या 'मिराज 2000' च्या 12 लढाऊ विमानांची हा हल्ला केला.

पुणे :  ‘हाऊ इज दी खौफ’, ‘‘लार्जेस्ट नंबर आॅफ सोल्जर्स सरेंडरींग’ ये वर्ल्ड रेकॉर्ड बना दिया, वो १९७१ था. अब २०१९ है. अब उस से भी बडा रेकॉर्ड बनाना हे क्या’’, ‘इंडिया के प्लेन घुस रहे थे तब पाकिस्तान सौदी अरेबिया से फेके हुए चवन्नींया इकठ्ठा कर रहा था,’ या सारख्या अनेक खोचक प्रतिक्रिया पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफुर यांना ऐकवण्यात आल्या आहेत. ट्विटरवर अ‍ॅक्टिव्ह झालेल्या देशप्रेमी भारतीयांनी मेजर जनरल असिफ गफुर यांची चांगलीच कोंडी केल्याचे दिसून येत आहे. 

पाकिस्तानी सैन्याचे अधिकृत प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफुर यांनी ट्विटरवरुन भारतीय वायुसेनेच्या हल्ल्याची माहिती आज सकाळी दिली. मुझफराबाद सेक्टर मधून भारतीय लढाऊ विमानांनी नियंत्रण रेषेचे उल्लंघन करुन हल्ल्याचा प्रयत्न केला. परंतु, कुठल्याही मालमत्तेचे नुकसान अथवा जीवितहानी झालेली नाही. पाकिस्तानी वैमानिकांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर भारतीय विमानांनी पळ काढला, अशा आशयाची पोस्ट आणि फोटो असिफ गफुर यांनी शेअर केले. त्यावर भारतीय ट्विटरवर युजर्स तुटून पडले आहेत. त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न पाकिस्तानी नागरिक करत असल्याने असिफ गफुर यांच्या अकाऊंटवरही भारत-पाक ट्विटरवर युद्ध रंगले आहे. मात्र तिथेही भारतीयांचाच विजय होत असल्याचे दिसत आहे. 


‘‘फिर वही बात, कारगिर हो या कारगल ठोका तो हम ने था’’, असे अनीस खान लोधीने म्हटले आहे. त्याची खिल्ली उडवताना बॉम्बे डकने म्हटले आहे, की ‘कब तक धोके मे जिओगे भाई. एक काम करो. पहले टायपिंग और इंग्लिश सुधारो.’ अली-बिलाल म्हणतो, ‘‘सर डोन्ट लेट देम गो बॅक अलाईव्ह (भारतीयांना जीवंत परत जाऊ देऊ नका).’’ त्याला गिरीश भारद्वाजने उत्तर दिले आहे, ‘‘आम्ही बॉम्ब टाकले आणि सुरक्षितपणे परतही आलो. त्यावेळी तुमची लढाऊ विमाने टोमॅटो खरेदी करण्यात व्यस्त असतील.’’ महत्त्वाचे साहित्य टाकून भारतीय विमानांनी पळ काढल्याचे सांगत गफुर यांनी यंत्राचा फोटो ट्विट केला आहे. त्याची खिल्ली उडवताना अंकुर ठाकूर म्हणतो, ‘‘सनी देओलने हाताने उपसून काढलेल्या हात पंपाचा फोटो तुम्ही पोस्ट केला आहे.’’ तर गब्बरने चेष्टा करताना म्हटले आहे, ‘‘तुमच्या विमानांच्या आधी तुमचे फोटोग्राफर घटनास्थळी पोचलेले दिसतात.’’ 


‘‘४५ फौजी मारे है ना, तुम्हारे घर मे घुस के. पुलवामा इतनी जल्दी भुल गय’’ असा प्रश्न खलील अहमद शफीने विचारला आहे. त्याची टर उडवताना अवधेश चौधरी म्हणतो, ‘‘हर जंग हारे हो. अपने अब्बा से पुछ. तुम कितने लोगो ने सरेंडर किया था इंडियन आर्मी के आगे?’’ थँक यू इंडियन एअर फोर्स या नावाने टिष्ट्वटर हँडल असलेल्या भारतीयाने उत्तर दिले आहे, ‘‘हर बार मार खाते हो. पिटने के बाद चिल्लाते हो, हम जीत गये. बेशरम पाकिस्तानीयो.’’ ‘भारतीय विमाने पाकिस्तानी हद्दीत घुसल्याचे तरी मान्य केलेत ना. आता हळू हळू बाकी सगळेही मान्य कराल,’ असा टोमणा तथागत यांनी लगावला आहे.


भारतीय राजकारणाचेही पडसाद काही कॉमेंट्समधून उमटले आहेत. भारतीय विमानांनी एलओके ओलांडून हल्ला केल्याचे सांगितले, त्याचे फोटो प्रकाशित केले, या बद्दल असिफ गफुर यांचे आभार मानले आहेत. ‘बरे झाले, आता केजरीवाल आणि राहुल गांधींना हे दाखवता येईल’, असी खोचक टीप्पणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गफुर यांचे हे अधिकृत ट्विटर अकाऊंट असल्याने पाकिस्तानातल्या प्रमुख दैनिकांनी त्याचा हवाला दिला आहे. सोबत त्याची छायाचित्रे स्वत:च्या संकेतस्थळांवरुन प्रकाशित केली असल्याने भारतीयांनी केलेली चेष्टादेखील त्या सोबत जगभरच्या वाचकांपर्यंत पोचली आहे.

दरम्यान, भारतीय वायु सेनेच्या 'मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर 1000 किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळापास 200 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येत आहे. दहशवाद्यांवर कारवाई करताना भारतीय वायुसेनेने पाकिस्तानला मोठा चकवा दिला आहे. पाकिस्तानला हल्ला करण्यात येणार आहे, याचा सुगावा लागू नये म्हणून भारतीय वायु सेनेने देशातील 20 विमानतळांवरून 'मिराज'च्या  विमानांचे उड्डाण केले. या मध्ये ग्वाल्हेर, भटिंडा, अंबाला या विमानतळांचा समावेश आहे. 

जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्याची, सर्जिकल स्ट्राइक-२ करण्याची तीव्र भावना देशभरातून व्यक्त होत होती. जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर बॉम्बवर्षाव करून भारताने आज पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतीय लष्कराच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. 

Web Title: Indian Air Strike on Pakistan: twitter handler attack on Major General Asif Ghafoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.