श्रीमंत देशांमध्ये भारत सहाव्या स्थानावर, अमेरिका सर्वात श्रीमंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 04:50 AM2018-01-31T04:50:55+5:302018-01-31T04:51:12+5:30

जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या क्रमवारीत भारताने सहावा क्रमांक पटकावला आहे. भारतातील एकूण संपत्तीचे मूल्य ८,२३० अब्ज डॉलर इतके आहे.

 India is ranked sixth in the richest countries, the richest in America | श्रीमंत देशांमध्ये भारत सहाव्या स्थानावर, अमेरिका सर्वात श्रीमंत

श्रीमंत देशांमध्ये भारत सहाव्या स्थानावर, अमेरिका सर्वात श्रीमंत

Next

नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या क्रमवारीत भारताने सहावा क्रमांक पटकावला आहे. भारतातील एकूण संपत्तीचे मूल्य ८,२३० अब्ज डॉलर इतके आहे.
न्यू वर्ल्ड वेल्थ या संस्थेने तयार केलेल्या अहवालानूसार अमेरिका हा जगातील सर्वात श्रीमंत देश आहे. २०१७ साली अमेरिकेची एकूण
संपत्ती ६४,५८४ अब्ज डॉलर इतकी होती.
दुसरा क्रमांकावर असलेल्या चीनची एकूण संपत्ती २४,८०३ अब्ज डॉलर, तिसरा क्रमांक पटकाविलेल्या जपानची एकूण संपत्ती १९,५२२ अब्ज डॉलर, चौथ्या क्रमांकावरील ब्रिटनची संपत्ती ९,९१९ अब्ज डॉलर, पाचव्या क्रमांकावरील जर्मनीची संपत्ती ९,६६० अब्ज डॉलर आहे.
भारत सहाव्या क्रमांकावर असून, त्यांनंतर फ्रान्स (७) , कॅनडा (८), आॅस्ट्रेलिया (९) व इटली (१०) क्रमांक आहे.

अशी मोजली संपत्ती
प्रत्येक देशातील खाजगी संपत्तीची मोजदाद करुन त्या देशाच्या एकुण संपत्तीचा आकडा निश्चित करण्यात आला आहे. सरकारकडे असलेल्या निधीची रक्कम या मोजदादीतून वगळण्यात आली आहे.

संपत्तीत २५ टक्के वाढ
२०१६ मध्ये भारताची एकुण संपत्ती ६५८४ अब्ज डॉलर होती. २०१७मध्ये ती ८२३० अब्ज डॉलर झाली. म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा २०१७मध्ये भारताच्या एकुण संपत्तीत २५ टक्के वाढ झाली. भारतामध्ये १ दशलक्ष डॉलर किंवा त्याहून अधिक संपत्ती असलेले ३,३०,४०० लोक आहेत.

Web Title:  India is ranked sixth in the richest countries, the richest in America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत