आळतेत अंगणवाडीचे उद्घाटन

By admin | Published: January 1, 2017 12:10 AM2017-01-01T00:10:10+5:302017-01-01T00:10:10+5:30

आळते : आळते (ता. हातकणंगले) येथे जि. प. सदस्य अरुण इंगवले यांच्या व ग्रामपंचायतीच्या विशेष फंडातून अंगणवाडीचे उद्घाटन हातकणंगलेचे तहसीलदार वैशाली राजमाने यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी अरुण इंगवले होते.

Inauguration of Anganwadi | आळतेत अंगणवाडीचे उद्घाटन

आळतेत अंगणवाडीचे उद्घाटन

Next
ते : आळते (ता. हातकणंगले) येथे जि. प. सदस्य अरुण इंगवले यांच्या व ग्रामपंचायतीच्या विशेष फंडातून अंगणवाडीचे उद्घाटन हातकणंगलेचे तहसीलदार वैशाली राजमाने यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी अरुण इंगवले होते.
आळते येथे गेल्या बरेच दिवसांपासून अंगणवाडीच्या इमारतीची आवश्यकता होती. आजतागायत खासगी भाडेप˜्यावरती सदरच्या अंगणवाड्या चालविल्या जात हेात्या. अरुण इंगवले यांनी जिल्हा परिषदेमधील विकास निधी व ग्रामपंचायतीमधील विकास निधी यांच्या संयुक्तपणे दोन इमारतींचे बांधकाम करण्यात आले.
कार्यक्रमासाठी किरणराव इंगवले, अण्णासाहेब पाटील, माणिक संकान्ना, बादशहा मुजावर, संजय दीक्षित, बाबासोा मुजावर, सुभाष करके, आळतेच्या सरपंच चॉँदबी मुजावर, उपसरपंच महावीर पाटील, अजिंक्य इंगवले, आदी उपस्थित होते.

Web Title: Inauguration of Anganwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.