अनैतिक संबंध, दिल्लीत हत्या, भरतपूरमध्ये पुरला मृतदेह..., खुनी पत्नीचा भयावह कट, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 11:33 PM2023-08-06T23:33:07+5:302023-08-06T23:33:39+5:30

Crime News: अनैतिक संबंधातून झालेल्या हत्येच्या एका धक्कादायक घटनेचा उलगडा झाला आहे.

Immoral affair, murder in Delhi, dead body buried in Bharatpur..., horrifying plot of murderous wife, followed by... | अनैतिक संबंध, दिल्लीत हत्या, भरतपूरमध्ये पुरला मृतदेह..., खुनी पत्नीचा भयावह कट, त्यानंतर...

अनैतिक संबंध, दिल्लीत हत्या, भरतपूरमध्ये पुरला मृतदेह..., खुनी पत्नीचा भयावह कट, त्यानंतर...

googlenewsNext

राजस्थानमधून हत्येच्या एका धक्कादायक घटनेचा उलगडा झाला आहे. सीआरपीएफमध्ये कॉन्स्टेबल असलेल्या महिलेने प्रियकरासोबत मिळून पतीची दिल्लीमध्ये हत्या केली. त्यानंतर तिच्या प्रियकराने भरतपूरमधील बानसूर येथे खड्डा खोदून त्यात या व्यक्तीचा मृतदेह पुरला. धक्कादायक बाब म्हजे या महिलेचा प्रियकरसुद्धा सीआरपीएफमध्ये असल्याचे समोर आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मुळचा राजस्थानमधील असलेला संजय जाट हा पत्नी पूनम जाट हिच्यासह सध्या दिल्लीमध्ये राहत होता. त्याची पत्नी सीआरपीएफमध्ये कॉन्स्टेबल पदावर तैनात आहे. तिचं बानसूर मधील रहिवासी असलेल्या रामप्रताप सोबत अफेअर सुरू आहे. दरम्यान पती मारहाण करतो असं सांगून पूनम हिने प्रियकर राम प्रताप याला दिल्लीत बोलावून घेतले.

राम प्रताप हा दिल्लीला आल्यावर या ३१ जुलै रोजी दोघांनीही मिळून संजय जाट याची हत्या केली. त्यानंतर या महिलेचा प्रियकर असलेला राम प्रताप हा तिच्या पतीचा मृतदेह घेऊन बानसूर येथे आला. तिथे त्याने आपल्या घराच्या जवळ असलेल्या जागेत खड्डा खोदून हा मृतदेह पुरून टाकला. या दरम्यान संजयच्या नातेवाईकांनी तो बेपत्ता असल्याची खबर पोलीस ठाण्यात दिली.

पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्यांना संजयची पत्नी पूनम हिच्यावर संशय आला. यादरम्यान, तिने गुन्हा कबूल केला. त्यानंतर पोलिसांनी ४ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास राम प्रताप याला ताब्यात घेतले. तसेच त्याने दिलेल्या माहितीनुसार मृतदेह शोधून काढला.  

Web Title: Immoral affair, murder in Delhi, dead body buried in Bharatpur..., horrifying plot of murderous wife, followed by...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.