प्रद्युम्नची हत्या करणाऱ्या विद्यार्थ्याने पोलिसांना कसा दिला गुंगारा, सीबीआय करणार तपास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 12:06 PM2017-11-14T12:06:31+5:302017-11-14T12:09:17+5:30

गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थी प्रद्युम्न याच्या हत्येच्या तपासामधून दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या हत्येप्रकरणी अकरावीतील एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे.

How did the student who killed the Pradyumna gave the police? | प्रद्युम्नची हत्या करणाऱ्या विद्यार्थ्याने पोलिसांना कसा दिला गुंगारा, सीबीआय करणार तपास

प्रद्युम्नची हत्या करणाऱ्या विद्यार्थ्याने पोलिसांना कसा दिला गुंगारा, सीबीआय करणार तपास

Next

गुरुग्राम/नवी दिल्ली - गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थी प्रद्युम्न याच्या हत्येच्या तपासामधून दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या हत्येप्रकरणी अकरावीतील एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. दरम्यान, प्रद्युम्नच्या हत्येनंतर आरोपी विद्यार्थ्याने पोलिसांना कसा काय गुंगारा दिला याचा तपास सीबीआय करणार आहे. 
प्रद्युम्नच्या हत्येप्रकरणी पोलिसांचे लक्ष महत्त्वपूर्ण पुराव्यांकडे कसे काय गेले नाही, हा प्रश्न पोलिसांची या प्रकरणातील भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आणत आहे. प्रद्युम्नची हत्या करणारा खरा गुन्हेगार कोण आहे, याची गुरुग्राम पोलिसांना आधीपासूनच माहिती असावी आणि त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले गेले, असा सीबीआयला संशय आहे. 
या हत्येप्रकरणी 11वीमधील विद्यार्थ्याला दोषी मानल्यानंतर सीबीआयने ही हत्या पूर्वनियोजित असल्याच्या दिशेने तपास सुरू केला आहे. प्रद्युम्नची हत्या  त्याच विद्यार्थ्याने केल्याची पुष्टी करणाने अनेक पुरावे सीबीआयला मिळाले आहेत. आता या प्रकरणात ल्याला वाचवण्यामध्ये कोण कोण सहभागी होते याचा तपास होत आहे. आता या प्रकरणात महिन्याभरामध्ये सीबीआयकडून आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे.  
प्रद्युम्नची हत्या त्याच विद्यार्थ्याने केली आहे, याची माहिती शाळेचे प्रशासन आणि पोलिसांना होती. तसेच या हत्याकांडाचे पुरावे मिटवण्यासाठी मोठे षडयंत्र रचण्यात आले होते, असा दावा सीबीआयने केला आहे. या प्रकाराचा छडा लावण्यासाठी सीबीआयने संबंधित पोलीस, शालेय प्रशासन आणि शाळेतील अनेक कर्मचाऱ्यांची चौकशी केली आहे. तसेच सीबीआयने सोमवारी गुरुग्राम पोलिसांच्या स्पेशल इन्वेस्टिगेशन टीमलाही चौकशीसाठी बोलावले होते.  
10 दिवस तपास करूनही पोली एवढे मह्त्त्वपूर्ण पुरावे का गोळा करू शकली नाही याची विचारणा एसआयटीकडे करण्यात आली. आम्ही  सीसीटीव्ही फुटेज वारंवार पाहिले, तसेच 100 हून अधिक जणांची चौकशी केली. मात्र  सीबीआयने ज्या विद्यार्थ्याला आरोपी बनवले त्याला आपण मुख्य साक्षीदार मानत होतो, असा दावा एसआयटीने केला आहे.  
प्रद्युम्नच्या हत्येचा तपास करणाऱ्या सीबीआयने या हत्येप्रकरणी अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला अटक केली होती. आता त्याने गुरुग्राम पोलिसांना कसा काय गुंगारा दिला याचा तपास करण्यात येणार आहे.  
 गुरगावच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधील प्रद्युम्नच्या हत्येप्रकरणी अकरावीतील विद्यार्थ्याला ताब्यात घेतल्यानंतर सीबीआयने आपला तपास इतर विद्यार्थ्यांच्या दिशेने वळवला आहे. या हत्येत इतर विद्यार्थीही सहभागी असावेत, असा संशय आहे. आणखी चार विद्यार्थ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता असली तरी अधिकारी आताच याविषयी बोलण्यास तयार नाहीत. चारपैकी एका विद्यार्थ्याची चौकशीही झाली आहे.
शुक्रवारी रायन स्कूलच्या माजी कर्मचा-यांचीही चौकशी झाली. पोलिसांना एक चाकू हस्तगत केला असून, तो तपासातील मुख्य पुरावा ठरू शकेल. प्रद्युम्नच्या हत्येनंतर शाळा प्रशासन व आरोपी विद्यार्थ्याचे नातेवाईक यांनी पोलिसांशी संगनमत करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला का, याचाही सीबीआय तपास करीत आहे.

Web Title: How did the student who killed the Pradyumna gave the police?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.