पाटीदार नेता हार्दिक पटेलची अजून एक कथित सीडी व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 02:01 PM2017-11-14T14:01:02+5:302017-11-14T14:04:04+5:30

पाटीदार नेता हार्दिक पटेल याच्या कथित सेक्स सीडीवरून गुजरातमधील वातावरण चांगलेच तापले आहे. या परिस्थितीत मंगळवारी हार्दिक पटेलची अजून एक सेक्स सीडी व्हायरल झाली आहे.

Hardy Patel's yet another alleged CD Viral | पाटीदार नेता हार्दिक पटेलची अजून एक कथित सीडी व्हायरल

पाटीदार नेता हार्दिक पटेलची अजून एक कथित सीडी व्हायरल

Next

अहमदाबाद - पाटीदार नेता हार्दिक पटेल याच्या कथित सेक्स सीडीवरून गुजरातमधील वातावरण चांगलेच तापले आहे. या परिस्थितीत मंगळवारी हार्दिक पटेलची अजून एक सेक्स सीडी व्हायरल झाली आहे.  या व्हिडीओमध्ये एक तरुण आणि दोन तरुणी दिसत आहेत.
हार्दिक पटेल याची एका महिलेसोबतचा कथित व्हिडीओ सोमवारी प्रसारित झाला होता. त्यानंतर वातावरण तापलेले असतानाच दुसरा व्हिडीओसुद्धा लीक झाला आहे. या व्हिडिओमध्ये असलेला तरुण हार्दिक पटेल असल्याचा दावा केला जात आहे.  दरम्यान, हार्दिक पटेलच्या कथित सीडी प्रकरणामुळे गुजरातचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यातील स्थानिक वृत्तवाहिन्यांवर हा व्हिडीओ प्रसारित झाल्यापासून जोरदार -आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 
  हार्दिक पटेलनेही चारित्र्यहननाच्या या प्रकाराचा सामना करण्याच आपण सज्ज असल्याचे संकेत देताना मी नामर्द नाही, जर व्हिडीओमधील व्यक्ती मी असतो तर थेट समोर आलो असतो, असे म्हटले होते. दुसरीकडे काल प्रसारित झालेल्या प्रकरणातील भाजपा कनेक्शन समोर आले आहे. ही व्हि़डीओ सीडी प्रसारित करणारा अश्विन सांकडसरिया याची मनसुख मांडविया यांच्यासोबतचे छायाचित्र प्रसारित झाले होते. आता हे छायाचित्र समोर आल्यानंतर हार्दिक पटेल आणि काँग्रेसकडून भाजपावर होत असलेले हल्ले अधिकाधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. 
  या व्हिडिओमागे भाजपचा हात असून गुजरातमध्ये घाणेरडे राजकारण होत असल्याचा आरोप हार्दिक पटेलने केला होता. या व्हिडिओत दिसत असलेली व्यक्ती आपण नसून, मला बदमान केल्यास हरकत नाही, पण या व्हिडिओमधूम गुजरातमधील महिलांना बदनाम करण्यात येत आहे, असा आरोप केला. 
गुजरातमध्ये  हार्दिक पटेलचा एका महिलेसोबतचा व्हिडीओ सोमवारी व्हायरल झाला होता.  सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेल्या या व्हिडिओमध्ये हार्दिक पटेलसारखा दिसणार तरुण एका महिलेसोबत बंद खोलीत असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या तारखेवरून हा व्हिडिओ मे महिन्यात शूट करण्यात आलेला असण्याची शक्यता आहे. 
 गुजरात विधानसभा निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी भाजपा माझी बनावट सेक्स सीडी जारी करुन मला बदनाम करण्याचा प्रयत्न करू शकते, असा धक्कादायक आरोप पाटीदार आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलनं काही दिवसांपूर्वी केला होता.  ''मला बदनाम करण्यासाठी भाजपानं माझी बनवाट सेक्स सीडी बनवली आहे. ही सीडी बरोबर निवडणुकीपूर्वी जारी करण्यात येईल. याहून भाजपाकडून आणखी काय अपेक्षा केली जाऊ शकते. म्हणून प्रतीक्षा करा, पाहा आणि आनंद घ्या''. असे त्याने त्यावेळी म्हटले होते.  

Web Title: Hardy Patel's yet another alleged CD Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.