हरयाणात दुसरीतील विद्यार्थ्याची शाळेत हत्या, बस कंडक्टरने केले कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 12:50 AM2017-09-09T00:50:32+5:302017-09-09T00:50:53+5:30

हरयाणातील रेयान इंटरनॅशनल स्कूलच्या टॉयलेटमध्ये दुसरीत शिकणाºया ७ वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

 In Harayana, another student was killed in school, bus conductor did the work | हरयाणात दुसरीतील विद्यार्थ्याची शाळेत हत्या, बस कंडक्टरने केले कृत्य

हरयाणात दुसरीतील विद्यार्थ्याची शाळेत हत्या, बस कंडक्टरने केले कृत्य

googlenewsNext

गुरगाव : हरयाणातील रेयान इंटरनॅशनल स्कूलच्या टॉयलेटमध्ये दुसरीत शिकणा-या ७ वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या विद्यार्थ्याची धारदार शस्त्राने हत्या केल्याचे दिसून आले. शुक्रवारी सकाळी शाळा सुरू झाल्यानंतर जेमतेम अर्ध्या तासाने हा प्रकार उघडकीस आला.
गुरगावमधील भोंडसी परिसरातील सोहना मार्गावर रेयान इंटरनॅशनल स्कूल आहे. या शाळेच्या टॉयलेटमध्ये प्रद्युम्न नावाच्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडल्यानंतर शाळेने लगेच पोलिसांना तसेच पालकांना बोलावून घेतले.
पालकांना फोन करून, तुमचा मुलगा आजारी आहे, लगेच निघून या, असे कळविले. पालक शाळेत पोहोचल्यावरच त्यांना आपल्या मुलाची हत्या झाल्याचे समजले. प्रद्युम्नची गळा चिरून हत्या करण्यात आली. तो सकाळी सव्वाआठच्या सुमारास शाळेत आला. त्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजेच पावणेनऊच्या सुमारास त्याची हत्या झाल्याची माहिती शाळा व्यवस्थापनाने त्याच्या पालकांना दिली. शाळेने योग्य माहिती आपल्याला कळवलीच नाही. शाळा व्यवस्थापनाने वेळीच आपल्या मुलाला हॉस्पिटलमध्ये नेले असते तर त्याचा जीव वाचला असता, असा आरोप प्रद्युम्नचे वडील वरूण ठाकूर यांनी केला.
बस कंडक्टरने केले कृत्य-
हत्या झाल्याच्या काही तासांमध्ये पोलिसांनी स्कूल बसच्या कंडक्टरला अटक केली असून, अशोक कुमार असे त्याचे नाव आहे. त्याने हत्येची कबुली दिली आहे. अशोक कुमारने या सात वर्षांच्या या प्रद्युम्नवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला विरोध करत हा चिमुकला ओरडू लागला. आपला भांडाफोड होईल, या भीतीने अशोकने अखेर चाकूने प्रद्युम्नचा गळा कापला आणि चाकू तेथेच टाकून पळ काढला. पोलिसांनी सुरुवातीला दहा जणांना ताब्यात घेतले होते. त्यातील काहिंनी अशोकला पळताना पाहिल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली.

Web Title:  In Harayana, another student was killed in school, bus conductor did the work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.