भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 08:39 AM2018-12-31T08:39:29+5:302018-12-31T08:51:26+5:30

मिठाने भरलेला ट्रेलर अनियंत्रित होऊन डिव्हायडर तोडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जात एसयूव्हीला धडकल्याने झाला अपघात

Gujarat: Ten people dead after a car got crushed between two trucks | भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू 

भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू 

ठळक मुद्देगुजरातमधील कच्छ जिल्ह्यात भचाऊजवळ काल झाला भीषण अपघातमिठाने भरलेला ट्रेलर अनियंत्रित होऊन डिव्हायडर तोडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जात एसयूव्हीला धडकलाअपघातात एकाच कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू

कच्छ -  गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात भचाऊजवळ काल रात्री झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेले कुटुंबीय एसयूव्हीमधून प्रवास करत होते. दरम्यान, त्यांचे वाहन दोन ट्रकांच्या मध्ये आल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 
याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, काल रात्री भचाऊ महामार्गावर हा अपघात झाला. मिठाने भरलेला ट्रेलर अनियंत्रित होऊन डिव्हायडर तोडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जात एसयूव्हीला धडकला. त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकनेही एसयूव्हीला धडक दिली. या भीषण अपघातात एसयूव्हीमधील दहा जणांचा मृत्यू झाला. 




मृत व्यक्ती आपले निवासस्थान असलेल्या भूज येथे जात होते. त्याचवेळी हा अपघात झाला. दरम्यान, मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी या अपघाताबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच पीडितांना सर्वतोपरी मदत देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.  

Web Title: Gujarat: Ten people dead after a car got crushed between two trucks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.