गुजरात निवडणूक - जागा वाटपावरुन राहुल गांधी आणि हार्दिक पटेल समर्थकांमध्ये तुफान राडा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 08:35 AM2017-11-20T08:35:56+5:302017-11-20T10:53:59+5:30

गुजरात निवडणुकीत हातात हात घालून निवडणूक लढण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेस आणि पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. तिकीट वाटपात आपल्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या सदस्यांनी केला आहे.

Gujarat elections - Rahul Gandhi and Hardik Patel supporters stormed into space after allotment of seats | गुजरात निवडणूक - जागा वाटपावरुन राहुल गांधी आणि हार्दिक पटेल समर्थकांमध्ये तुफान राडा

गुजरात निवडणूक - जागा वाटपावरुन राहुल गांधी आणि हार्दिक पटेल समर्थकांमध्ये तुफान राडा

googlenewsNext
ठळक मुद्देकाँग्रेस आणि पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडातिकीट वाटपात आपल्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या सदस्यांचा आरोपकाँग्रेसने रात्री उशिरा 77 उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली

अहमदाबाद - गुजरात निवडणुकीत हातात हात घालून निवडणूक लढण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेस आणि पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. पटेलांचं वर्चस्व असलेल्या सुरतमधील वरच्चा रोड येथून काँग्रेसने प्रफुल्ल तोगडिया यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या कार्यालयाजवळच दोन्ही कार्यकर्ते आपापसांत भिडले. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. तिकीट वाटपात आपल्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या सदस्यांनी केला आहे. काँग्रेसने रात्री उशिरा 77 उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली. काँग्रेसच्या यादीत पाटादीर अनामत आंदोलन समितीच्या दोन नेत्यांच नाव होतं. 

पटेल आरक्षणा फॉर्म्युल्यावरुन काँग्रेस आणि पाटादीर अनामत आंदोलन समितीच्या नेत्यांमध्ये रविवारी बैठक झाल्यानंतर, दोन्ही पक्षांनी यशस्वी चर्चा झाली असल्याचा दावा केला होता. पण अद्यापही चर्चा अपुर्ण असून अनेक गोष्टी पुर्णत्वास नेण्याचं बाकी असल्याचं दिसत आहे. काँग्रेसने यादी जाहीर करताच पटेल आणि काँग्रेसमधील चर्चेचा बुडबुडा फुटला. काँग्रेसच्या 77 उमेदवारांच्या यादीत दोन पाटीदार नेत्यांना जागा देण्यात आली आहे. 



 

'जोपर्यंत तिकीट वाटपात आम्हाला योग्य तो वाटा मिळत नाही, तोपर्यंत आम्ही शहरातील काँग्रेस कार्यालयाचं कामकाज चालूच देणार नाही', असा इशारा सुरतमधील पाटीदार अनामत आंदोलन समितीचे निमंत्रक धार्मिक मालविया यांनी दिला आहे. 

हार्दिक पटेलचे निकटवर्तीय आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर पाटीदार अनामत आंदोलन समितीतर्फे काँग्रेसशी चर्चा करण्यासाठी नेमण्यात आलेले दिनेश बंभानिया बोलले आहेत की, 'काँग्रेसने कोअर कमिटीला विश्वासात न घेतला पाटीदार सदस्यांच्या तिकीटाची घोषणा केली आहे. आम्ही काँग्रेस कार्यालयांवर हल्ला करत आपला विरोध व्यक्त करणार'.



 

याआधी पाटीदार अनामत आंदोलन समिती पाच जागांवर निवडणूक लढण्यासाठी तयार झाली होती. काँग्रेसने रविवारी रात्री उशिरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली ज्यामध्ये दोन पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या नेत्यांची नावे होती. राजकोटमधील धोराजी मतदारसंघातून काँग्रेसने ललित वसोया आणि जुनागढमधून अमित थुम्मार यांना उमेदवारी जाहीर केली. 

सोमवारी हार्दिक पटेल अधिकृतपणे काँग्रेसला पाठिंबा जाहीर करणार असल्याचं सांगण्यात येत होतं. काँग्रेससोबत झालेल्या चर्चेनंतर फॉर्म्युल्यावर प्रश्न विचारला असता नेत्यांना हार्दिक पटेल सोमवारी जाहीर करतील असं सांगत माहिती देण्यास नकार दिला होता. मुख्यमंत्री विजय रुपाणी सोमवारी राजकोटमधून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दरम्यान हार्दिक पटेलचा कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती मिळत आहे. 

Web Title: Gujarat elections - Rahul Gandhi and Hardik Patel supporters stormed into space after allotment of seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.