गुजरात निवडणूक: पाहता क्षणी मॉडेल वाटणा-या श्वेता ब्रह्मभट्टचा 75 हजार मतांनी पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 12:49 PM2017-12-18T12:49:39+5:302017-12-18T13:24:49+5:30

गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना सगळयांचेच लक्ष मणिनगरच्या निकालाकडे लागले होते.

Gujarat elections: At the moment, Shweta Bramhatta, who represents the model, lost by 75,000 votes | गुजरात निवडणूक: पाहता क्षणी मॉडेल वाटणा-या श्वेता ब्रह्मभट्टचा 75 हजार मतांनी पराभव

गुजरात निवडणूक: पाहता क्षणी मॉडेल वाटणा-या श्वेता ब्रह्मभट्टचा 75 हजार मतांनी पराभव

googlenewsNext

अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना सगळयांचेच लक्ष मणिनगरच्या निकालाकडे लागले होते. मणिगनरमधून भाजपाचे सुरेश पटेल विजयी झाले असून त्यांनी काँग्रेस उमेदवार श्वेता ब्रह्मभट्टचा  75,199 मतांनी पराभव केला. मागच्यावेळी सुरेश पटेल इथून 87 हजार मतांनी जिंकले होते. दोन कारणांमुळे मणिनगरच्या निकालाकडे सगळयांचे लक्ष लागले होते.  
मणिनगर हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. 2014 साली लोकसभेवर जाण्यापूर्वी मोदी तीनवेळा याच मतदारसंघातून निवडून विधानसभेवर गेले होते.

काँग्रेसने यावेळी मणिनगरमधून श्वेता ब्रह्मभट्टचा उमेदवारी दिल्याने हा मतदारसंघ पुन्हा चर्चेत आला होता. श्वेता ब्रह्मभट्टचा सौंदर्यामुळे माध्यमांनी तिला भरपूर प्रसिद्धी दिली. श्वेताचा फोटो किंवा तिला पाहिल्यानंतर ती मॉडेल असल्याचा अनेकांचा समज होतो. उच्चशिक्षित असलेल्या श्वेताने इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून काम केले आहे. श्वेताला मणीनगरमधून उमेदवारी जाहीर झाली. तिच्या उमेदवारीवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी श्वेताला तिकिट दिले म्हणून आंदोलनही केले होते.

श्वेताला कॉर्पोरेट क्षेत्रात काम करायचे होते. बीबीएमध्ये पदवी घेतल्यानंतर तिने लंडनच्या  विद्यापीठातून मास्टर्सची पदवी घेतली. त्यानंतर एचएसबीसी आणि डाराशॉमध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून काम केले. त्यानंतर समाजकारण आणि कॉर्पोरेट क्षेत्र असे दोन पर्याय समोर असताना तिने समाजकारणाची निवड केली. 2012 मध्ये श्वेताला विधानसभा निवडणूक लढवायची संधी होती पण करीयर महत्वाचे असल्याने तिने ऑफर नाकारली.  1990 पासून मणिनगर भाजपाचा गड असून इथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राज्य मुख्यालय आहे. 

Web Title: Gujarat elections: At the moment, Shweta Bramhatta, who represents the model, lost by 75,000 votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.