गुजरात विधानसभा निवडणूक : काँग्रेसचे दलित संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 01:03 AM2017-11-14T01:03:42+5:302017-11-14T01:04:40+5:30

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस तिथे दलितांचे मोठे संमेलन आयोजित करण्याच्या तयारीत आहे. या संमेलनाचा उद्देश दलितांच्या प्रश्नांवर चर्चा करून पक्षाच्या जाहीरनाम्यात त्यांचा समावेश करण्याचा आहे.

 Gujarat assembly election: Dalit assembly of Congress | गुजरात विधानसभा निवडणूक : काँग्रेसचे दलित संमेलन

गुजरात विधानसभा निवडणूक : काँग्रेसचे दलित संमेलन

Next

शीलेश शर्मा 
नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस तिथे दलितांचे मोठे संमेलन आयोजित करण्याच्या तयारीत आहे. या संमेलनाचा उद्देश दलितांच्या प्रश्नांवर चर्चा करून पक्षाच्या जाहीरनाम्यात त्यांचा समावेश करण्याचा आहे.
संमेलनाची जबाबदारी पक्षाचे नेते राजू यांच्याकडे आहे. तरीही या संमेलनाचे मुख्य करविते सॅम पित्रोदा आहेत. अल्पेश ठाकोर व जिग्नेश मेवानी यांच्याशी राहुल गांधी यांच्या झालेल्या चर्चेत काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दलितांच्या मागण्यांचा समावेश करण्याचा मुद्दा होता. राहुल यांनीही दलितांचे हित अबाधित राखण्यासाठी काँग्रेस तयार असल्याचे आश्वासनही दिले होते.
मेवानी यांनी संमेलनासाठी दलितांच्या २० संघटनांची यादी दिली होती व त्यांच्याशी थेट संवाद साधण्यासही सांगितले होते. गुजरातेत दलित मतदार सात टक्क्यांपेक्षाही जास्त आहेत.

Web Title:  Gujarat assembly election: Dalit assembly of Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.