सरकारी शाळांत नर्सरी सुरू करणार , पूर्वप्राथमिक शिक्षणावर सरकारचे विचारमंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 02:31 AM2018-01-01T02:31:45+5:302018-01-01T02:32:05+5:30

देशभरातील विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्यापूर्वी किती आणि कसा अभ्यास करावा याबाबत सरकार मंथन करत असून, सरकारी शाळांमध्येही नर्सरी वर्ग सुरू करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

 Government schools to start nursery in government schools, government think-tank on pre-primary education | सरकारी शाळांत नर्सरी सुरू करणार , पूर्वप्राथमिक शिक्षणावर सरकारचे विचारमंथन

सरकारी शाळांत नर्सरी सुरू करणार , पूर्वप्राथमिक शिक्षणावर सरकारचे विचारमंथन

googlenewsNext

- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : देशभरातील विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्यापूर्वी किती आणि कसा अभ्यास करावा याबाबत सरकार मंथन करत असून, सरकारी शाळांमध्येही नर्सरी वर्ग सुरू करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
मुलांच्या मनात अभ्यासाबाबत असणारी भीती आणि दडपण कमी करण्याच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. याअंतर्गत शाळा आणि माध्यमिक स्तरावर शिक्षणात बदल करण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. दरम्यान, प्ले स्कूलच्या गळेकापू स्पर्धेपासून विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी सर्व सरकारी शाळात नर्सरी, प्ले स्कूल सुरु करावेत असाही प्रस्ताव आहे.
एका अधिकाºयाने सांगितले
की, यासाठी लवकरच एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाऊ शकते. सरकार यावर विचार करत आहे की, ज्या प्रकारे प्ले-स्कूल एक व्यवसाय होत चालला असताना यामुळे
विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासावर याचा प्रतिकूल परिणाम होऊ नये.
प्ले स्कूलने स्पर्धेतून मुलांना अनावश्यक पुस्तके, अ‍ॅक्टिव्हिटी किंवा खेळाचे अनावश्यक ओझे लादू नये. अशावेळी मानसशास्त्रातील तज्ज्ञ, समुपदेशक आणि शिक्षण
क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्यासोबत सरकार यावर विचारविनिमय करणार आहे. शाळेत जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी नेमका कशाचा अभ्यास करावा याची माहितीही सरकार घेऊ इच्छिते.
एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, प्ले स्कूलच्या गळेकापू स्पर्धेपासून विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी सर्व सरकारी शाळात नर्सरी, प्ले स्कूल सुरु करावेत असाही प्रस्ताव आहे. राज्य सरकारांना प्रेरित करण्यात यावे की, किमान मोठ्या शहरात राज्य सरकारने आपल्या प्राथमिक विद्यालयात नर्सरी वर्ग सुरु करावेत.
जेथे शक्य असेल तेथे असे स्कूल सुरु करावेत. गरज भासल्यास यात एनजीओ आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाºया संस्थांची मदत घ्यावी.

Web Title:  Government schools to start nursery in government schools, government think-tank on pre-primary education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.