गवे गावगिरी

By admin | Published: September 13, 2014 10:59 PM2014-09-13T22:59:55+5:302014-09-13T22:59:55+5:30

ाव्या रेड्यांचा मृत्यू हणखणे : रानटी जनावरांपासून शेतीचे रक्षण करण्यासाठी लावलेल्या विद्युत तारांचा स्पर्श होऊन हळर्ण येथे दोन गव्या रेड्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबतही माहिती प्राणीमित्र अमृतसिंग यांनी पेडणे वनखात्याच्या अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून देताच वन खात्याचे अधिकारी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. हळर्ण भागात गेल्या काही वर्षापासून रानटी जनावरे शेतकर्‍यांची शेती आणि बागायती फस्त करून शेतकर्‍यांना आर्थिक नुकसानीकडे नेत आहेत. यापूर्वी हत्ती या भगात येऊन बागायतीचीही नासाडी केली आणि आता हळर्ण पंचायत क्षेत्रात असलेल्या भल्या मोठय़ा जंगलात गव्या रेड्याचे थवेच्या थवे थांबले असून त्यापासून हळर्ण, खुटवळ, हसापूर, कासारवर्णे, चांदेल, हणखणे आणि इब्रामपूर परिसरातील शेती खाऊन नष्ट करीत आहेत. याबाबत अनेकवेळा वृत्तपत्रातून सचित्र बातम्या प्रसिद्ध झाल्या. शासनाकडे आर्थिक म्

Gave Gavagiri | गवे गावगिरी

गवे गावगिरी

Next
शिक : कॉलेजरोडला समांतर असलेल्या कॅनॉलरोडवर कृषिनगर चौफुली सध्या चक्रव्यूह बनली आहे. महापालिकेने वाहतूक बेट साकारण्यासाठी दोर्‍या बांधून जो गोंधळ निर्माण केला आहे त्यामुळे वाहनचालकांना कोठून कोठे जायचे याचा बोध होत नसल्याने दिवसभरात अनेक अपघात होत आहेत.
बारा बंगला जलशुद्धिकरण केंद्राकडून कृषिनगर जॉगिंग ट्रॅकने पुढे गेल्यानंतर याठिकाणी चौफुली आहे. एचपीटी कॉलेजच्या चौफुलीतून कृषिनगरच्या पुढे पारिजातनगरकडे जाण्यासाठी हाच मार्ग आहे, तसेच कृषिनगर जॉगिंग ट्रॅककडून मॉडेल कॉलनी चौकाकडेदेखील ही चौफुली पार करूनच जावे लागते. महापालिकेने कृषिनगर चौफुलीवर वाहतूक बेट विकसित केले होते; परंतु त्यामुळे गोंधळ उडत होता. त्यामुळे येथे नव्या पद्धतीचे वाहतूक बेट बांधण्याचे ठरविण्यात आले. काही महिन्यांपूर्वी ग्रीन स्पेस डेव्हलपर्सच्या वतीने वाहतूक बेट विकसित करण्याची जबाबदारी घेतल्यानंतर भूमिपूजन सोहळा पार पडला; परंतु अद्याप वाहतूक बेट साकारले नाही. नवीन वाहतूक बेट साकारण्यासाठी येथील जुने बेट नष्ट करण्यात आले असून, तेथे दोर्‍या बांधून मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. पालिकेने सोयीने केलेले काम वाहनचालकांसाठी मात्र गैरसोयीचे ठरत आहे. जॉगिंग ट्रॅककडे जाण्यासाठी कोणी कुठून वळावे हेच समजत नाही आणि कॉलेजरोडकडून आणि मॉडेल कॉलनी चौकातून आलेल्या वाहनचालकांनी रस्ता कसा ओलांडावा हे स्पष्ट होत नसल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडत असून, वाहन कसे चालवावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिका आता याठिकाणी नवीन वाहतूक बेट साकारण्यापूर्वी एखाद्याचा बळी जाण्याची वाट बघत आहे काय, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.
...छायाचित्र क्रमांक २० पीएचएम ८४,८५,८६,८७

Web Title: Gave Gavagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.