ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे भारतात 'जय सियाराम'ने स्वागत; अश्विनी चौबेंकडून भगवद्‌गीता आणि रुद्राक्ष भेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 06:44 PM2023-09-08T18:44:47+5:302023-09-08T18:45:55+5:30

केंद्रीय मंत्री चौबे यांनी ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांचे जावई आणि भारताची मुलगी म्हणून स्वागत केले.

g20 summit british pm welcomed with jai siyaram ashwini choubey told rishi sunak importance of buxar | ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे भारतात 'जय सियाराम'ने स्वागत; अश्विनी चौबेंकडून भगवद्‌गीता आणि रुद्राक्ष भेट!

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे भारतात 'जय सियाराम'ने स्वागत; अश्विनी चौबेंकडून भगवद्‌गीता आणि रुद्राक्ष भेट!

googlenewsNext

नवी दिल्ली : शनिवारपासून सुरू होणाऱ्या G20 परिषदेसाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक शुक्रवारी येथे दाखल झाले. पत्नी अक्षता मूर्तीसह ऋषी सुनक यांचे पालम विमानतळावर केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त अॅलेक्स एलिस यांनी स्वागत केले. येथील विमानतळावर ऋषी सुनक यांच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पारंपरिक नृत्याला ब्रिटनच्या पाहुण्यांनी दाद दिली. आपल्या तीन दिवसीय दौऱ्यात ऋषी सुनक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत.

विशेष म्हणजे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे त्यांच्या पूर्वजांच्या भूमीवर अभिनंदन करताना केंद्रीय मंत्री चौबे यांनी त्यांना जय सियाराम म्हणत शुभेच्छा दिल्या. अश्विनी चौबे यांचे माध्यम सल्लागार पंकज मिश्रा यांनी सांगितले की, स्वागत समारंभात केंद्रीय मंत्री चौबे यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांना जय सियाराम म्हणत त्यांच्या पूर्वजांच्या भूमीवर त्यांचे अभिनंदन केले.

केंद्रीय मंत्री चौबे यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना सांगितले की, ते बिहारमधील बक्सरचे खासदार आहेत. यासोबतच त्यांनी ऋषी सुनक बक्सरचे महत्त्वही सांगितले. केंद्रीय मंत्री म्हणाले, "बक्सर हे प्राचीन काळापासून आध्यात्मिकदृष्ट्या प्रसिद्ध शहर आहे. जिथे भगवान श्रीराम आणि त्यांचा भाऊ लक्ष्मण यांनी गुरु महर्षि विश्वामित्र यांच्याकडून दीक्षा घेतली होती आणि ताडकाचा वध केला होता. यावेळी ऋषी सुनक यांनी भारताची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कथा उत्साहाने ऐकली."

याचबरोबर, केंद्रीय मंत्री चौबे यांनी ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांचे जावई आणि भारताची मुलगी म्हणून स्वागत केले. केंद्रीय मंत्री चौबे म्हणाले की, भारताची भूमी ही तुमच्या पूर्वजांची भूमी आहे आणि तुमच्या इथे येण्याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. तसेच, केंद्रीय मंत्री चौबे यांनी ऋषी सुनक आणि त्यांची पत्नीअक्षता मूर्ती यांना अयोध्या, बक्सर आणि बांका येथील मंदार पर्वतासह सीतामढी, आई जानकीचे जन्मस्थान असलेल्या अध्यात्मिक संस्कृतीची माहिती दिली. यावेळी केंद्रीय मंत्री चौबे यांनी ऋषी सुनक यांना रुद्राक्ष, श्रीमद भागवत गीता आणि हनुमान चालिसाही भेट दिली.

Web Title: g20 summit british pm welcomed with jai siyaram ashwini choubey told rishi sunak importance of buxar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.