बिहारमध्ये ट्रेनच्या धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 08:55 IST2018-02-02T08:36:59+5:302018-02-02T08:55:49+5:30

बिहारमधील सिवान जिल्ह्यातील कचहरी स्टेशनजवळ ट्रेनच्या धडकेत 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. 

Four dead after being run over by a train in Bihar's Siwan. | बिहारमध्ये ट्रेनच्या धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू

बिहारमध्ये ट्रेनच्या धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू

पाटणा - बिहारमधील सिवान जिल्ह्यातील कचहरी स्टेशनजवळ ट्रेनच्या धडकेत 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.  तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी ( 2 जानेवारी ) पहाटेची ही घटना आहे. हे सर्वजण स्मशानभूमीहून परतत असताना ही दुर्घटना घडली आहे. ही ट्रेन गोपालगंजच्या दिशेनं जात असताना या पाच जणांना धडक बसली. मृत पावलेले सर्वजण गोपलगंजमधील रहिवासी होते. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दाट धुक्यामुळे ट्रेन येत असल्याचा अंदाज या पाच जणांना आला नाही. परिणामी ट्रेनची जोरदार धडक त्यांना बसली व यातील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला.  पोलीस व जीआरपी घटनास्थळी दाखल झाले असून सर्व मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.  
 



 



 

Web Title: Four dead after being run over by a train in Bihar's Siwan.