डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 10:22 AM2023-09-26T10:22:47+5:302023-09-26T10:24:22+5:30

Dr. Manmohan Singh Birthday : डॉ. मनमोहन सिंग यांनी 2004 ते 2014  या काळात दोन वेळा देशाचे पंतप्रधान म्हणून काम केले.

former pm dr manmohan singh birthday prime minister narendra modi wish long and healthy life | डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाले...

डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाले...

googlenewsNext

नवी दिल्ली :  देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा आज 91 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने देशभरातून डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनीही डॉ. मनमोहन सिंग यांना त्यांच्या 91 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर म्हणाले, "माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी तुमच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतो."

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी ब्रिटिश भारतातील पंजाब प्रांतातील चकवाल जिल्ह्यात झाला. हा जिल्हा आता पाकिस्तानात येतो. पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी 1982 ते 1985 या काळात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर म्हणून काम केले. माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये ते अर्थमंत्रीही होते. 1991 मध्ये भारतात आर्थिक उदारीकरण आणण्यात त्यांची मोठी भूमिका होती. 

डॉ. मनमोहन सिंग यांनी 2004 ते 2014  या काळात दोन वेळा देशाचे पंतप्रधान म्हणून काम केले. ते देशाचे महान राजकारणी तर आहेतच, पण एक उत्कृष्ट अर्थतज्ज्ञ म्हणूनही त्यांची ओळख आहे. मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठातून शिक्षण घेतले आणि त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ब्रिटनला गेले होते. त्यांनी ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्रात प्रथम श्रेणीसह पदवी प्राप्त केली होती. 

याचबरोबर, डॉ. मनमोहन सिंग यांनी 1962 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डी.फिल पूर्ण केले. तसेच, त्यांनी पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक सदस्य म्हणूनही काम केले. UNCTAG सचिवालयात काही काळ काम केल्यानंतर, त्यांनी 1987 ते 1990 दरम्यान जिनिव्हा येथे दक्षिण आफ्रिकन आयोगाचे महासचिव म्हणून काम केले होते.

अनेक प्रमुख पदे भूषवली
डॉ. मनमोहन सिंग यांनी 1970 आणि 1980 च्या दशकात भारत सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. त्यांनी मुख्य आर्थिक सल्लागार (1972-76), रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर (1982-85) आणि नियोजन आयोगाचे अध्यक्ष (1985-87) म्हणून काम केले. डॉ. मनमोहन सिंग 1991 आणि 1996 मध्ये देशाचे अर्थमंत्रीही होते. ते सध्या राजस्थानमधून राज्यसभा सदस्य आहेत.

Web Title: former pm dr manmohan singh birthday prime minister narendra modi wish long and healthy life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.