Atal Bihari Vajpayee: देवेंद्र फडणवीसांचं मॉडेलिंग पाहून वाजपेयी मजेत म्हणाले होते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 20:17 IST2018-08-16T20:13:59+5:302018-08-16T20:17:52+5:30
2004 मध्ये फडणवीस एका कपड्याच्या दुकानाच्या जाहिरातीत झळकले होते

Atal Bihari Vajpayee: देवेंद्र फडणवीसांचं मॉडेलिंग पाहून वाजपेयी मजेत म्हणाले होते...
मुंबईः देशाचे माजी पंतप्रधानअटलबिहारी वाजपेयी हे फर्डे वक्ते होते, त्यांच्या लेखणीलाही एक धार होती. पण, हास्य-विनोद करायलाही त्यांना तितकंच आवडायचं. खास करून, भाजपच्या तरुण कार्यकर्त्यांशी बोलताना ते थोडीशी गंमत करायचे, फिरकी घ्यायचे. त्यांच्या या स्वभावाचा अनुभव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. तो किस्सा फडणवीस यांनी २०१६च्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर पुरस्कार' सोहळ्यात सांगितला होता.
२००४ मध्ये नागपुरातील एका कपड्याच्या दुकानाच्या जाहिरातीत तरुण-तडफदार देवेंद्र फडणवीस मॉडेल म्हणून झळकले होते. त्यांच्या मित्राने आधी गंमत म्हणून वेगवेगळ्या कपड्यांमध्ये त्यांचे फोटो काढून घेतले होते आणि नंतर एका जाहिरातीच्या होर्डिंगवर वापरले होते. तो असं काही करेल असं फडणवीसांनाही वाटलं नव्हतं. पण, ही होर्डिंग्ज नागपुरात सर्वत्र झळकली होती. त्यानंतर जे घडलं ते देवेंद्र यांच्यासाठी अधिकच अनपेक्षित आणि मजेशीर होतं.
मी जाहिरातीत झळकल्यानंतर एक दिवस मला वाजपेयींनी बोलावून घेतलं होतं आणि माझ्या पाठीवर थाप मारून 'मॉडेल एमएलए अशी हाक मारली होती, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं.
पाहा व्हिडीओः