Former Chancellor Kishor Gajbhia and Uttam Khobragade in Congress | माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये आणि उत्तम खोब्रागडे काँग्रेसमध्ये
माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये आणि उत्तम खोब्रागडे काँग्रेसमध्ये

नवी दिल्ली : माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये आणि उत्तम खोब्रागडे यांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. या दोघांनीही शुक्रवारी दिल्लीत कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. गांधी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
खोब्रागडे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला होता. बेस्टचे महासंचालक म्हणून खोब्रागडे यांची कारकीर्द वादळी ठरली होती. किंगलाँग बसेसची खरेदी करण्यासह त्यांनी घेतलेले अनेक निर्णय वादग्रस्त ठरले होते. भारतीय परराष्टÑ सेवेत असलेली त्यांची कन्या देवयानी खोब्रागडे यांच्यावर मोलकरणीचे आर्थिक शोषण केल्यासंदर्भात ठपका ठेवण्यात आला होता.
किशोर गजभिये यांनी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाचा राजीनामा देऊन खासगी कंपनीत नोकरी पत्करली होती. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी मायावतींच्या बहुजन समाज पार्टीत प्रवेश केला होता. गजभिये यांचे सामाजिक कार्य मोठे आहे. ते विविध सामाजिक संस्थांशी जुळले आहेत.


Web Title: Former Chancellor Kishor Gajbhia and Uttam Khobragade in Congress
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.