दिल्लीत कार अपघात, पॉवर लिफ्टर खेळाडूसह पाच ठार; गाडीत आढळल्या दारूच्या बाटल्या'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 12:59 AM2018-01-08T00:59:56+5:302018-01-08T01:00:05+5:30

वायव्य दिल्लीत दिल्ली-हरियाना सीमेनजिक रविवारी पहाटे झालेल्या कार अपघातात पाच जण ठार तर एक जखमी झाला. मृतांमध्ये राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूचा समावेश आहे. अपघात अलीपूर पोलिस ठाण्यानजिक सिंघू सीमेनजिक झाला.

 Five killed in car accident, power lifter in Delhi; The liquor bottles found in the car | दिल्लीत कार अपघात, पॉवर लिफ्टर खेळाडूसह पाच ठार; गाडीत आढळल्या दारूच्या बाटल्या'

दिल्लीत कार अपघात, पॉवर लिफ्टर खेळाडूसह पाच ठार; गाडीत आढळल्या दारूच्या बाटल्या'

Next

नवी दिल्ली : वायव्य दिल्लीत दिल्ली-हरियाना सीमेनजिक रविवारी पहाटे झालेल्या कार अपघातात पाच जण ठार तर एक जखमी झाला. मृतांमध्ये राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूचा समावेश आहे. अपघात अलीपूर पोलिस ठाण्यानजिक सिंघू सीमेनजिक झाला.
भरधाव वेगातील कार चालकाचा ताबा सुटून आधी ती रस्ता दुभाजकावर धडकून नंतर खांबावर आदळली. उप पोलिस आयुक्त (रोहिणी) रजनीश गुप्ता यांनी सांगितले की, मृतांमध्ये राष्ट्रीय पातळीवरील पॉवर लिफ्टर सक्षम यादव, तिकमचंद, सौरभ, आकाश आणि हरीश रॉय यांचा समावेश आहे. सक्षम सुरुवातीला जखमी होता. त्याला वायव्य दिल्लीतील शालिमार बागेतील मॅक्स हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आले होते. तेथून अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या
(एम्स) ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आले होते. मात्र उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला. एम्सच्या वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले की सक्षम यादव यांच्या डोक्याला इजा झाली होती. अंतर्गत रक्तस्राव सुरू होता. वाहनात दारुच्या बाटल्या सापडल्या असून नशेत वाहन चालवले जात होते का याचा तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title:  Five killed in car accident, power lifter in Delhi; The liquor bottles found in the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात