वडील आमदार, मुलगा विधानसभेमध्ये शिपाई! विरोधकांनी सरकारवर केला वशिलेबाजीचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 12:17 AM2017-12-24T00:17:50+5:302017-12-24T00:21:23+5:30

वडील राजकारणात असले की त्यांची मुले अनेकदा राजकारणात येतात. पण राजस्थानात भाजपा आमदाराच्या मुलाला विधानसभेत शिपाई म्हणून नोकरी मिळाली आहे. तो १२वीपर्यंत शिकला आहे. मात्र एमबीए, पीएच.डी. उमेदवारांना बाजूला सारून आमदारपुत्राला नोकरी मिळाल्याने विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केली आहे.

Father, MLA, son in the Legislative Assembly! Opponents accused the government of indulging in sedition | वडील आमदार, मुलगा विधानसभेमध्ये शिपाई! विरोधकांनी सरकारवर केला वशिलेबाजीचा आरोप

वडील आमदार, मुलगा विधानसभेमध्ये शिपाई! विरोधकांनी सरकारवर केला वशिलेबाजीचा आरोप

Next

जयपूर : वडील राजकारणात असले की त्यांची मुले अनेकदा राजकारणात येतात. पण राजस्थानात भाजपा आमदाराच्या मुलाला विधानसभेत शिपाई म्हणून नोकरी मिळाली आहे. तो १२वीपर्यंत शिकला आहे. मात्र एमबीए, पीएच.डी. उमेदवारांना बाजूला सारून आमदारपुत्राला नोकरी मिळाल्याने विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केली आहे.
आमदार जगदीश नारायण मीणा हे भाजपाचे नेते आहेत. ते दलित आहेत. त्यांचा मुलगा राम किशन याची १८ हजार ८ उमेदवारांतून शिपाई म्हणून निवड झाली. शिपाई या पदासाठी १८ जणांची निवड करण्यात आली. त्यात त्याचा १२वा क्रमांक लागला.
मुलाखतीनंतर रामकिशनची निवड झाल्याचे समितीने म्हटले आहे, तर त्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्याचे कारण नाही, असे मीणा म्हणाले. भावंडांची तसेच शेतीची जबाबदारी त्याच्यावर होती. त्यामुळे त्याला शिक्षण पूर्ण करता आले नाही, असेही मीणा यांनी सांगितले.
मात्र काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी मीणा हे आमदार असल्यामुळेच त्यांच्या मुलाला लगेच नोकरी मिळाली, असा आरोप केला. या भरती प्रक्रियेची चौकशी व्हावी, अशी मागणीही विरोधकांनी केली आहे. भाजपा सरकारने तरुणांना १५ लाख नोकºया देण्याचे आश्वासन दिले होते. पण सत्ताधारी पक्षाचे नेते, कुटुंबीय आणि नातेवाइकांना नोकºया दिल्या जात आहेत, असा टोला राजस्थान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी लगावला. (वृत्तसंस्था)

या आधीही असाच घडला प्रकार
याआधी भाजपाचे आमदार हिरालाल वर्मा यांच्या हंसराज या मुलाला शिपाई अजमेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोकरी मिळाली होती. हंसराज केवळ आठवी शिकला होता. त्याने राजकारणात येऊ नये, असे माझे म्हणणे होते आणि आहे, असे वर्मा म्हणाले होते.

Web Title: Father, MLA, son in the Legislative Assembly! Opponents accused the government of indulging in sedition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.