देशात दर चार मिनिटांनी एकाचा अपघाती मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 04:02 AM2018-03-30T04:02:13+5:302018-03-30T04:02:13+5:30

देशात दर ४ मिनिटांनी एकाचा अपघाती मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

Every four minutes in the country, one accidental death! | देशात दर चार मिनिटांनी एकाचा अपघाती मृत्यू!

देशात दर चार मिनिटांनी एकाचा अपघाती मृत्यू!

googlenewsNext

मुंबई : देशात दर ४ मिनिटांनी एकाचा अपघाती मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील रस्ते अपघातात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर असल्याचेही महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसने प्रकाशित केलेल्या ‘अ‍ॅक्सिडेंट इंडिया २०१६’ या अहवालातून समोर आले आहे.
या अहवालानुसार, मुंबईत रोज ४ हजार छोटे-मोठे रस्ते अपघात होतात. देशात १,५६८.७२ किलोमीटरचे राज्य महामार्ग, तर २३२.५८ किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. राज्यात १ हजार २१० अपघातस्थळे असून त्यातील सर्वाधिक मुंबईत असून त्याखालोखाल नाशिक विभागात अपघातप्रवण स्थळांची संख्या अधिक आहे. मुळात रस्ते वाहतुकीत होणाऱ्या सर्व अपघातांची नोंदणी नॅशनल क्राइम रेकॉडर््स ब्युरोकडून केली जात नाही, तसेच मृत्यूंच्या नेमक्या कारणाचा मृत्यूशी संबंधित आकडेवारीमध्ये अभाव असल्याने ट्रॉमाशी संबंधित मृत्यूंची नेमकी संख्या ओळखणे अवघड असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.
जगात होणाºया एकूण ट्रॉमा मृत्यूंपैकी पाव टक्का मृत्यू भारतात होतात. तर गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रात रस्ते अपघातांत अंदाजे दोन लाख लोक जखमी झाले आहेत. अल्प व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ट्रॉमॅटिक ब्रेन-इंज्युरीचे (टीबीआय) मुख्य कारण रस्ते वाहतुकीत होणारे अपघात असल्याचे अभ्यासातून दिसून येते. डॉ. नितीन जगसिया यांनी सांगितले की, अपोलो रुग्णालयातील आपत्कालीन विभागात प्रत्येक महिन्याला सरासरी ७ हजार २०० रुग्ण दाखल होत असून त्यात सर्वाधिक संख्या ही डोक्याला मार लागलेल्या रुग्णांची असते. ट्रॉमॅटिक ब्रेन इंज्युरींमुळे शारीरिक त्रासाबरोबरच आर्थिक भारही रुग्णांना सोसावा लागतो. ‘गोल्डन अवर’ दरम्यान किंवा दुखापतीनंतर पहिल्या तासामध्ये तातडीने व प्रभावी वैद्यकीय मदत मिळणे उपचारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते.

Web Title: Every four minutes in the country, one accidental death!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.