बलात्काराचे सव्वा लाख खटले अद्याप प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 01:01 AM2018-04-20T01:01:14+5:302018-04-20T01:01:14+5:30

सन २०१२पासून नोंदलेल्या बलात्काराच्या घटनांत ६० टक्क्यांची वाढ होऊन २०१६मध्ये त्या ४० हजार झाल्या.

Even more than one million cases of rape are pending | बलात्काराचे सव्वा लाख खटले अद्याप प्रलंबित

बलात्काराचे सव्वा लाख खटले अद्याप प्रलंबित

Next

नवी दिल्ली : भारतात बलात्कार करणाऱ्यास मृत्युदंडाच्या शिक्षेच्या तरतुदीसह कठोर कायदे व जलदगती न्यायालये स्थापन झाली असली तरी परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी चिंताजनक अवस्थेला गेली आहे.
सन २०१२पासून नोंदलेल्या बलात्काराच्या घटनांत ६० टक्क्यांची वाढ होऊन २०१६मध्ये त्या ४० हजार झाल्या. अल्पवयीनांवरील बलात्काराच्या घटना ४० टक्क्यांनी वाढल्या. या आरोपावरून अटक झालेले दोषी ठरण्याचे प्रमाण मात्र २५ टक्क्यांपर्यंतच आहे. २०१६च्या अखेरीस बलात्काराचे १,३३,०००पेक्षा जास्त खटले प्रलंबित असून, २०१२मध्ये हीच संख्या सुमारे एक लाख होती. बलात्कारांची प्रकरणे वाढत असताना, खटल्यांचे निकाल लागण्यास व दोषींना शिक्षा होण्यास विलंब होत आहे. विलंबामुळे अनेकदा आरोपी सुटतात असेही आढळून आले आहे.

Web Title: Even more than one million cases of rape are pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.