पुलवामामध्ये लष्कराची धडाकेबाज कारवाई, तीन दहशतवाद्यांचा खात्मा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 09:04 PM2018-06-29T21:04:30+5:302018-06-29T21:04:57+5:30

काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांविरोधात लष्कराने आक्रमक पवित्रा घेतला असून, शुक्रवारी संध्याकाळी पुलवामा येथे केलेल्या धडाकेबाज कारवाईत लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

Encounter in pulwama, three terrorists killed | पुलवामामध्ये लष्कराची धडाकेबाज कारवाई, तीन दहशतवाद्यांचा खात्मा 

पुलवामामध्ये लष्कराची धडाकेबाज कारवाई, तीन दहशतवाद्यांचा खात्मा 

Next

श्रीनगर - काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांविरोधात लष्कराने आक्रमक पवित्रा घेतला असून, शुक्रवारी संध्याकाळी पुलवामा येथे केलेल्या धडाकेबाज कारवाईत लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. पुलवामामधील छतपोरा भागात लष्कराने या दहशतवाद्यांना कंठस्नान घातले असून, या कारवाईनंतर परिसरामध्ये मोठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच कारवाईदरम्यान परिसरातील इंटरनेटसेवा खंडित करण्यात आली आहे.
 




 पोलिसांच्या उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुलवामाच्या मुख्य परिसरातील छतपोरा भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर लष्कराच्या 55 राष्ट्रीय रायफल्स, जम्मू काश्मीर पोलिसांचे एसजीओ आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तपणे कारवाईस सुरुवात केली. शोधमोहिमेदरम्यान दहशतवादी एका घरात लपून बसल्याचे आढळले. त्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबारास सुरुवात केली. जवानांनीही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर अतिरिक्त सुरक्षा दलांना तैनात करून मोठ्या कारवाईस सुरुवात करण्यात आली. अखेर  या कारवाईत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. 

Web Title: Encounter in pulwama, three terrorists killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.