भंडारा-गोंदिया, कैरानामध्ये निवडणुकीदरम्यान EVMमध्ये या कारणामुळे झाला होता बिघाड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2018 09:00 AM2018-06-09T09:00:58+5:302018-06-09T09:39:23+5:30

उत्तर प्रदेशातील कैराना आणि महाराष्ट्रातील भंडारा-गोंदियासहीत 10 जागांवर पोटनिवडणुकीदरम्यान ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

election commission expert report vvpat evm failure byelection bhandara gondiya lok sabha | भंडारा-गोंदिया, कैरानामध्ये निवडणुकीदरम्यान EVMमध्ये या कारणामुळे झाला होता बिघाड

भंडारा-गोंदिया, कैरानामध्ये निवडणुकीदरम्यान EVMमध्ये या कारणामुळे झाला होता बिघाड

Next

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील कैराना आणि महाराष्ट्रातील भंडारा-गोंदियासहीत 10 जागांवर पोटनिवडणुकीदरम्यान ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला होता. पराभवाच्या भीतीनं भाजपानं ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आरोपही विरोधकांनी केला होता. ईव्हीएमबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर निवडणूक आयोगाच्या टेक्निकल एक्सपर्ट टीमनं 10 जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीदरम्यान ईव्हीएमच्या बिघाडामागील कारण शोधून काढलं आहे. 

(कैरानाचा धडा; ऊस उत्पादकांच्या मतांसाठी मोदींनी लगावला 'हा' मास्टरट्रोक)

(Bypoll Results: देशातील १४ पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसला 'अच्छे दिन', भाजपाचं 'कमळ' कोमेजलं!)

टीमनं आपला तपासणी अहवाल निवडणूक आयोगाकडे सोपवला आहे. अति उष्णता, आर्द्रता आणि यंत्रांची योग्य ती देखभाल न केल्यामुळे ईव्हीएममध्ये बिघाड झाला, असे टेक्निकल एक्सपर्ट टीमनं आपल्या अहवालात म्हटले आहे.   28 मे रोजी पोटनिवडणुकीमध्ये भीषण उष्णतेदरम्यान उत्तर प्रदेशातील कैराना आणि महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात ईव्हीएममध्ये प्रचंड प्रमाणात बिघाड निर्माण झाला होता. 

Web Title: election commission expert report vvpat evm failure byelection bhandara gondiya lok sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.