देशातील ३६ रेल्वेस्थानक होणार ‘इको स्मार्ट’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 05:52 AM2019-01-27T05:52:33+5:302019-01-27T05:53:02+5:30

राष्ट्रीय हरित लवादाचे रेल्वे प्रशासनाला आदेश

Eco Smart | देशातील ३६ रेल्वेस्थानक होणार ‘इको स्मार्ट’

देशातील ३६ रेल्वेस्थानक होणार ‘इको स्मार्ट’

Next

नवी दिल्ली : पुढील तीन महिन्यात देशातील ३६ रेल्वे स्थानके भारतीय मानक ब्युरो (बीआयएस)च्या पर्यावरण मानक १४००१ नुसार विकसित करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. मॉडेल स्वरूपात या विकसित केल्या जाणाऱ्या या स्थानकांना 'इको स्मार्ट' स्थानकाच्या नावाने ओळखले जाणार आहेत. देशातील प्रमुख स्थानकांची यामध्ये निवड करण्यात येणार आहे.

न्या. आदर्श कुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या खंडपीठाने हा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाकडून देशातील ८ हजार स्थानकांची तीन वर्गामध्ये विभागणी करण्यात आली होती. यामधील ५२० स्थानकांचा उच्च श्रेणीत आहेत. १४८४ स्थानके मध्यम श्रेणीत तर ५९६६ स्थानकांचा कनिष्ठ श्रेणीत सहभाग आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यामध्ये ५२० मधील ३६ रेल्वे स्थानकांवर इको स्मार्ट स्थानक म्हणून ओळख देण्यात यावी, यासाठी मुख्य अधिकाºयाची नेमणूक करावी असे सांगण्यात आले आहे.

प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी
इको स्मार्ट स्थानके तयार करताना प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याविषयी विचार सुरू आहे. रेल्वे स्थानकावर पर्यावरणपूरक कोणत्याही गोष्टी केल्या जात नाहीत. बºयाचदा रेल्वे स्थानकांवर साफ सफाईही केली जात नाही. यापुढे पर्यावरण नियमांची अंमलबजावणी केली, की नाही याची वेळोवेळी पाहणी केली जाणार असल्याचे खंडपीठाकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: Eco Smart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे