मुलांवर आपले स्वप्न लादू नका- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 03:54 AM2019-01-30T03:54:21+5:302019-01-30T03:54:46+5:30

मोदींचा विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी ‘परीक्षा पे चर्चा-२’ कार्यक्रमातून संवाद

Do not light your dreams on children - Prime Minister Modi | मुलांवर आपले स्वप्न लादू नका- पंतप्रधान मोदी

मुलांवर आपले स्वप्न लादू नका- पंतप्रधान मोदी

Next

- एस.के. गुप्ता 

नवी दिल्ली : एखाद्या परीक्षेत काही कमी-जास्त झाल्याने आयुष्य थांबत नाही. आयुष्यात प्रत्येक क्षणी कसोटी आवश्यक आहे. अशा कसोटीला सामोरे न गेल्यास आयुष्य थांबल्यासारखे होते, असे सांगतानाच मुलांवर आपले स्वप्न लादू नका, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी ‘परीक्षा पे चर्चा-२’ या कार्यक्रमात त्यांनी संवाद साधला.

एका विद्यार्थ्याने मोदी यांना विचारले की, मुलांकडून पालकांना अधिक अपेक्षा असतात. तशी परिस्थिती पंतप्रधानांसमोर आहे. देशभरातील नागरिकांना मोदींकडून खूप अपेक्षा आहेत. यावर मोदी म्हणाले की, एका कवितेत म्हटल्याप्रमाणे, ‘कुछ खिलौने के टूटने से बचपन नहीं मरा करता है’

स्वत:ला सिद्ध करा
मोदी म्हणाले की, जर एखाद्याला आॅलिम्पिकमध्ये जायचे आहे; पण तो गाव, तालुका, इंटरस्टेट, नॅशनल स्तरावर खेळला नसेल, तर त्याने असे स्वप्न पाहून कसे चालेल? ते म्हणाले की, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्हाला स्वत:ला सिद्ध करावे लागेल; पण अपेक्षेच्या दबावात दबून जाता कामा नये. निराशेत बुडालेला समाज, परिवार वा व्यक्ती कोणाचेही भले करू शकत नाही.

Web Title: Do not light your dreams on children - Prime Minister Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.