‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न साकारणार!

By admin | Published: February 29, 2016 08:06 PM2016-02-29T20:06:23+5:302016-02-29T20:06:23+5:30

डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकार ग्रामीण भागात ‘डिजिटल साक्षरता मिशन’ योजना सुरू करत आहे. पुढील तीन वर्षांत या योजनेंतर्गत सहा कोटी कुटुंबाना

Digital India will dream of! | ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न साकारणार!

‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न साकारणार!

Next

साक्षरता मिशन : ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष

नवी दिल्ली : डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकार ग्रामीण भागात ‘डिजिटल साक्षरता मिशन’ योजना सुरू करत आहे. पुढील तीन वर्षांत या योजनेंतर्गत सहा कोटी कुटुंबाना संगणकाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. उपरोक्त योजनेबाबत अर्थमंत्री लवकरच सविस्तर माहिती देतील.
ग्रामीण भारतातील १६.८ कोटी कुटुंबांपैकी १२ कोटी कुटुंबांकडे कॉम्प्युटर नाही. त्यांना संगणक साक्षर करण्यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. शालेय प्रमाणपत्रांच्या सुरक्षिततेसाठी डिजिटल डिपॉझिटरी योजना सुरू करण्यात येणार आहे.
करदात्यांसाठी गत आर्थिक वर्षात प्रायोगिक तत्त्वावर ई-असेसमेंट राबविण्यात आले होते. येत्या वर्षात देशातील ७ महानगरांमध्ये संपूर्ण ई-असेसमेंट करण्यात येणार आहे. तसेच लहान करदात्यांसाठी ‘ई-सहयोग’ हा प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेला प्रकल्प आता पूर्ण क्षमतेने लागू करण्यात येणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Digital India will dream of!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.