देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

By admin | Published: October 28, 2014 04:38 PM2014-10-28T16:38:27+5:302014-10-28T19:40:20+5:30

स्वच्छ प्रतिमा आणि अभ्यासू नेते म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत.

Devendra Fadnavis is the new Chief Minister of Maharashtra | देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

Next

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २८ -  स्वच्छ प्रतिमा आणि अभ्यासू नेते म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. भाजपाच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषणवणारे फडवणीस हे विदर्भातील चौथे नेते आहेत.

मंगळवारी दुपारी चार वाजता भाजपाच्या विधीमंडळपक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत विधीमंडळ नेत्याची निवड करण्यात आली. मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता मावळल्याने नाराज असलेले एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव आमदारांसमोर मांडला. तर गडकरींसाठी आग्रही असलेले सुधीर मुनगंटीवार यांनी फडवणीस यांच्या नावाला अनुमोदन दिले. यानंतर सर्वानुमते फडणवीस यांची विधीमंडळ नेता म्हणजेच मुख्यमंत्रीपदासाठी निवड झाली. यानंतर पक्ष निरीक्षक राजनाथ सिंह व जे.पी. नड्डा यांनी फडणवीस यांची निवड झाल्याची अधिकृतरित्या जाहीर केले. वयाच्या ४४ वर्षी मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणारे फडणवीस हे शरद पवार यांच्यानंतर सर्वात कमी वयात मुख्यमंत्री होणारे दुसेर नेते आहेत. फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच नागपूरमधील त्यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्ते व समर्थकांनी एकच जल्लोष केला. 

३१ ऑक्टोबरला नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती भाजपा नेते जे.पी. नड्डा यांनी दिली. सुरुवातीला आम्ही छोटे मंत्रिमंडळ स्थापन करणार आहोत. शिवसेनेसोबत चर्चा सुरु असून यात सकारात्मक तोडगा निघेल अशी आशाही नड्डा यांनी व्यक्त केली.

संध्याकाळी देवेंद्र फडणवीस व अन्य भाजपा नेत्यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. शपथविधीनंतर बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी भाजपाला १५ दिवसांची मुदत दिली आहे. 

 

Web Title: Devendra Fadnavis is the new Chief Minister of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.