ठिय्या आंदोलनानंतर कांद्याचा लिलाव व्यापार्‍यांना लिलावास नकार : विक्रीमूल्य कपातीचा निर्णय

By admin | Published: December 21, 2014 11:49 PM2014-12-21T23:49:31+5:302014-12-21T23:49:31+5:30

राहुरी : शेतकर्‍यांऐवजी खरेदीदारांकडून आडत घेण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न झाला. हा निर्णय मान्य नसल्याची भूमिका घेत व्यापार्‍यांनी विक्रीसाठी आलेल्या कांद्याचे लिलाव थांबवले. शेतकर्‍यांनी ठिय्या आंदोलन करत सभापतींचे लक्ष वेधल्याने चर्चेअंती लिलाव पार पडले.

Denial of merchandise on sale of stakes after strike action: Decision on deduction of sale price | ठिय्या आंदोलनानंतर कांद्याचा लिलाव व्यापार्‍यांना लिलावास नकार : विक्रीमूल्य कपातीचा निर्णय

ठिय्या आंदोलनानंतर कांद्याचा लिलाव व्यापार्‍यांना लिलावास नकार : विक्रीमूल्य कपातीचा निर्णय

Next
हुरी : शेतकर्‍यांऐवजी खरेदीदारांकडून आडत घेण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न झाला. हा निर्णय मान्य नसल्याची भूमिका घेत व्यापार्‍यांनी विक्रीसाठी आलेल्या कांद्याचे लिलाव थांबवले. शेतकर्‍यांनी ठिय्या आंदोलन करत सभापतींचे लक्ष वेधल्याने चर्चेअंती लिलाव पार पडले.
शेतकर्‍यांऐवजी आता खरेदीदारांकडून आडत घेण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने व्यापार्‍यांनी कोणताही माल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला. रविवारी कांद्याचे लिलाव असल्याने बर्‍याच शेतकर्‍यांनी कांदा समितीत आणला होता. लिलावासाठी आलेला कांदा खराब होईल, खरेदी सुरू क रा असे म्हणत संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी अखेर ठिय्या आंदोलन छेडले़ राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरूण तनपुरे यांनी शेतकरी व खरेदीदार यांच्याशी चर्चा करून आलेला माल आजच्या दिवस खरेदी करण्याचा निर्णय घेतला़
रविवारी सकाळी साडेअकरा वाजता कांदा राहुरी बाजार समितीमध्ये आल्यानंतर लिलाव पुकारण्यासाठी कुणीही खरेदीदार नसल्याने कांदा खराब होणार म्हणून धास्तावलेल्या शेतक-यांनी नाराजी व्यक्त करीत आज आलेला माल तरी खरेदी करा अशी मागणी केला़ त्यावर सभापती अरूण तनपुरे यांनी सर्व शेतक-यांची संमती असेल तर समिती लिलाव सुरू करील, असे सांगितले़
पणन संचालक डॉ़ सुभाष माने यांनी पाठविलेल्या आदेशाची प्रत व्यापार्‍यांना देण्यात आली़ यावेळी व्यापार्‍यांच्या वतीने सुरेश बाफना यांनी चर्चेत भाग घेतला़ यावेळी शेतकरी बाळासाहेब गायकवाड, गोरख गायकवाड, विष्णू बावचे, संदीप तांबे, धमाजी जाधव, कैलास गव्हाणे, कचरू हारदे, बापू हारदे आदी शेतकरी उपस्थित होते.
---------
पणन संचालकांचा अचानक फॅक्स आल्यानंतर झेरॉक्स मारून खरेदीदारांना देण्यात आली़ आडत खरेदीदारांकडून घेण्याचा निर्णय झाल्याने लिलाव बंद पडले़ सकाळी भाजीपाल्याचे लिलाव झाले़ सर्वसंमतीने कादा लिलाव करण्यात आले़ यावर काहीतरी तोडगा काढू.
- अरूण तनपुरे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, राहुरी
-------
दूरवरून शेतकर्‍यांनी कांदा विक्रीसाठी आणला़ लिलाव झाला नाही तर कांंेब फुटून लाल कांदा खराब होण्याची भीती आहे़ आम्ही आणलेला कांदा पुन्हा घरी नेणे शक्य नसल्याने कांदा लिलाव सुरू करण्याची मागणी करण्यात आली़ शेतकर्‍यांचे नुकसान होणार नाही याचा विचार खरेदीदार व शासनाने करणे गरजेचे आहे़
- कचरू हारदे, कांदा उत्पादक शेतकरी

----------
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात शेतकर्‍यांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर चर्चा करताना सभापती अरूण तनपुरे व शेतकरी़

Web Title: Denial of merchandise on sale of stakes after strike action: Decision on deduction of sale price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.