दिल्ली - फैजाबाद रेल्वे रुळावरुन घसरली, 15 प्रवासी जखमी

By admin | Published: May 2, 2016 07:45 AM2016-05-02T07:45:51+5:302016-05-02T07:45:51+5:30

उत्तरप्रदेशातील हापूर जिल्ह्यात दिल्ली - फैजाबाद एक्स्प्रेसचे (14206) 8 डबे रुळावरुन घसरले आहेत, या दुर्घटनेत 15 प्रवासी जखमी झालेत मात्र सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही

Delhi-Faizabad railway track collapses, 15 passengers injured | दिल्ली - फैजाबाद रेल्वे रुळावरुन घसरली, 15 प्रवासी जखमी

दिल्ली - फैजाबाद रेल्वे रुळावरुन घसरली, 15 प्रवासी जखमी

Next
ऑनलाइन लोकमत - 
उत्तरप्रदेश, दि. 02 - दिल्ली - फैजाबाद एक्स्प्रेसचे (14206) 8 डबे रुळावरुन घसरले आहेत. उत्तरप्रदेशातील हापूर जिल्ह्यात रात्री ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. गढमुक्तेश्वर ते कंकाठेर दरम्यान रात्री 9 च्या दरम्यान ही रेल्वे घसरल्याची माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अनिल सक्सेना यांनी दिली आहे.
 
अपघातानंर रेल्वेचे 8 डबे रुळावरुन घसरत पुढे गेले होते. आतमध्ये फसलेल्या प्रवाशांना काचा फोडून बाहेर काढण्यात आले. रात्री 12.20 पर्यंत प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरु होते. ज्यामुळे पद्मावत एक्स्प्रेस, नौचंदी एक्स्प्रेस, सितापूर - दिल्ली एक्स्प्रेस आणि दोन पॅसेंजर ट्रेनना रस्त्यातच थांबवण्यात आलं होतं. अपघातानंतर गाजियाबादमधील रेल्वेचा मार्ग बदलण्यात आला. त्यांनी मेरठ - टपरी मार्ग मुरादाबादला पाठवण्यात आलं. 
 
हापूर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक राम नयन यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार या रेल्वे अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना बसच्या सहाय्याने मेरठ, गाजियाबाद आणि हापूरमधील रुग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आलं आहे. दिल्ली आणि मुरादाबाद येथून रेल्वेने मदतीसाठी गाड्या पाठवल्या आहेत. वरिष्ठ अधिका-यांनीदेखील घटनास्थळी धाव घेतली आहे. 
कोणत्याही प्रकारची आपात्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते यासाठी पीएल शर्मा जिल्हा रुग्णालय आणि लाला लजपत राय मेमोरिअल रुग्णालयात अतिरिक्त बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. मेरठ जिल्हा रुग्णालयाने आपात्कालीन क्रमांक 0-9410609434 जारी केला आहे. 
 
रेल्वे घसरल्यामुळे दिल्ली - मोरादाबादमधील अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूकीवर परिणाम झाला होता. ज्यामुळे अनेकांनी रस्त्याने प्रवास करण्याचा पर्याय घेतला होता. याचा परिणाम राष्ट्रीय महामार्ग 24 वर प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली होती. 
 

Web Title: Delhi-Faizabad railway track collapses, 15 passengers injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.