देशद्रोही कारवायांना स्थान दिल्यास पदवी वापसी - JNU च्या माजी विद्यार्थ्यांचा इशारा

By admin | Published: February 13, 2016 01:30 PM2016-02-13T13:30:36+5:302016-02-13T13:30:36+5:30

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ देशद्रोही कारवायांचा अड्डा बनत असून या विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी पदव्या परत करण्याचा इशारा दिला आहे

Degree withdrawal if anti-trafficking activities take place - JNU alumni warning | देशद्रोही कारवायांना स्थान दिल्यास पदवी वापसी - JNU च्या माजी विद्यार्थ्यांचा इशारा

देशद्रोही कारवायांना स्थान दिल्यास पदवी वापसी - JNU च्या माजी विद्यार्थ्यांचा इशारा

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - जवाहरलाल नेहरू विद्यापीठ देशद्रोही कारवायांचा अड्डा बनत असून या विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी पदव्या परत करण्याचा इशारा दिला आहे. संसदेवर हल्ला करणा-या अफझल गुरूच्या फाशीचा निषेध करणारी निदर्शने जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झाल्याचा दाखला यासाठी देण्यात आला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही या कृत्याचा निषेध करताना मोर्चाचे आयोजन केले आणि निषेध केला. 
जर विद्यापीठात अशा कार्यक्रमांना परवानग्या देण्यात आल्या तर आम्हाला आमच्या पदव्या परत कराव्या लागतील असा इशारा माजी सैनिकांनी कुलगूरू जगदीश कुमार यांना पत्र लिहून दिला आहे. 
शुक्रवारी पोलीसांनी जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हय्या कुमारला पोलीसांनी अटक केली आहे. अफझल गुरू प्रकरणात त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप लावण्यात आला आहे. भारतविरोधी कारवाया करणा-या कुणाचीही गट करू नका अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री राजनात सिंह यांनी पोलीसांना दिली आहे. या घटनेची चौकशी पूर्ण होईपर्यंत विद्यापीठाने आठ विद्यार्थ्यांवर बंदी घातली आहे, ज्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. शिस्तभंग समितीच्या अहवालावरून ही कारवाई करण्यात आली आहे. चौकसी पूर्ण होईपर्यंत या विद्यार्थ्यांना त्यांच्या वसतीगृहामध्ये राहण्याची अनुमती देण्यात आली आहे. 
अफझल गुरू आणि मकबूल भटच्या फाशीविरोधात काही विद्यार्थ्यांनी निदर्शने केली आणि काश्मिरींना स्वयंनिर्णयाचा लोकशाहीचा अधिकार मिळायला हवा अशी मागणीही केली. 

संघपरीवारातल्या एबीव्हीपी या विद्यार्थी संघटनेने या कार्यक्रमाविरोधात आक्षेप नोंदवला आणि त्यांनी कुलगुरूंकडे असे प्रकार विद्यापीठात होऊ नयेत अशी मागणी केली. विद्यापीठानेही सुव्यवस्था रहावी यासाठी हा मोर्चा रद्द करण्यास सांगितले, परंतु आयोजकांनी निदर्शने रद्द केली परंतु, विद्यापीठाला न जुमानता अफझलच्या फाशीवर फोटो प्रदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला. 

Web Title: Degree withdrawal if anti-trafficking activities take place - JNU alumni warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.