सायकलिंग स्पर्धेत महाराष्ट्राला उपविजेतेपद

By admin | Published: March 3, 2015 01:07 AM2015-03-03T01:07:23+5:302015-03-03T01:07:23+5:30

In the cycling competition Maharashtra will be runners-up | सायकलिंग स्पर्धेत महाराष्ट्राला उपविजेतेपद

सायकलिंग स्पर्धेत महाराष्ट्राला उपविजेतेपद

Next
>राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा : पल्लवी धनावडे, मयुर पवार, सचिन देसाईची आव्वल कामगिरी

पुणे : केरळातील त्रिवेंद्रम येथे झालेल्या सब ज्युनिअर नॅशनल ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वसाधरण उपविजेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या विविध गटात महाराष्ट्राच्या १४ सायकलिंगपटूंनी यश संपदान केले असून, पल्लवी धनावडे, मयुर पवार, सचिन देसाई यांनी आपापल्या गटात अव्वल कामगिरी केली आहे.
इंडिव्हिज्युअल परशुट (आयपी), टाईम ट्रायल (टीटी), टीम परशुट (टीपी), टीम स्प्रिंट (टीएस), स्क्रॅच रेस (एसआर) अशा विविध प्रकारात ही स्पर्धा झाली. स्पर्धेच्या १४ वर्षाखालील गटात पल्लवी धनावडे हिने ५०० मीटर टीटी व २ किलोमीटर आयपी प्रकारात पहिले स्थान पटकावले. शुभम भोसले २ किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत दुसरे स्थान मिळविले. स्पर्धेच्या १६ वर्षाखालील गटात मयुर पवार याने ५०० मीटर टीटी व टीएसमध्ये पहिले स्थान मिळविले. सचिन देसाईने ५ किलोमीटर एसआरमध्ये पहिले, २ किलोमीटर आयपीत तिसरे, टीएस प्रकारात पहिले, तर १८ वर्षाखालील गटातील टीपी प्रकारात तिसरे स्थान मिळविले. याच गटातील २ किलोमीटर आयपी प्रकारात अश्विन पाटीलने दुसरे व १८ वर्षाखालील टीपी प्रकारात तिसरा क्रमांक पटकावला. स्पर्धेच्या १८ वर्षाखालील गटात संजय शिंदे याने टीपी प्रकारात तिसरे, प्रफुल्ल शिंदे याने टीपी व १० किलोमीटर एसआर मध्ये तिसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले. अभिषेक अंबादासकर याने दोनशे मीटर एसआरमध्ये दुसरे स्थान राखले.
मुलींमध्ये वैष्णवी गभणे हिने १६ वर्षाखालील २ किलोमीटर आयपीत अव्वल, टीएसमध्ये दुसरे व १८ वर्षाखालील गटात टीपी प्रकारात दुसरे स्थान मिळविले. सुशिकला अगाशे हिने १६ वर्षाखालील ५०० मीटर टीटी, ५ किलोमीटर एसआर व २०० मीटर एसआर मध्ये तिसरे स्थान, तर १८ वर्षाखालील टीपी व टीएसमध्ये दुसरे स्थान पटकावले. मयुरी लुटे हिने १६ वर्षाखालील २ किलोमीटर आयपी, टीएस व १८ वर्षाखालील गटातील टीपी व टीएसमध्ये दुसरा क्रमांक मिळविला. रुतुजा सोलाट हिने १८ वर्षरखालील टीपी प्रकारात दुसरे, रुतुजा सातपुतेने वरीष्ठ ४ किलोमीटर अंतराच्या आयपीत तिसरे, तर दिपाली शिलदनकर हिने वरीष्ठ गटातील पॉईंट रेसमध्ये दुसरा क्रमांक पटकाविला.
----------------
टी फोल्डरमध्ये २ मार्च सायकलिंग

Web Title: In the cycling competition Maharashtra will be runners-up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.