२५ कोटींच्या कामांवरुन नगरसेवकांची खडसेंकडे तक्रार

By Admin | Published: November 2, 2015 12:04 AM2015-11-02T00:04:29+5:302015-11-02T00:04:29+5:30

जळगाव : मुख्यमंत्र्यांनी शहर विकासासाठी जाहीर केलेल्या २५ कोटींच्या निधीतून करावयाच्या कामाच्या यादीत भाजपा नगरसेवकांची अनेक कामेच समाविष्ट केलेली नसल्याची तक्रार काही नगरसेवकांनी रविवारी पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडे केली. त्यावर पालकमंत्र्यांनी त्या नगरसेवकांना त्यांच्या कामांची यादी आयुक्तांकडे सादर करण्याचे आदेश दिले असून आपण स्वत: ही यादी अंतिम करू, असे स्पष्ट केले आहे.

Corporator's complaint against 25 crore works | २५ कोटींच्या कामांवरुन नगरसेवकांची खडसेंकडे तक्रार

२५ कोटींच्या कामांवरुन नगरसेवकांची खडसेंकडे तक्रार

googlenewsNext
गाव : मुख्यमंत्र्यांनी शहर विकासासाठी जाहीर केलेल्या २५ कोटींच्या निधीतून करावयाच्या कामाच्या यादीत भाजपा नगरसेवकांची अनेक कामेच समाविष्ट केलेली नसल्याची तक्रार काही नगरसेवकांनी रविवारी पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडे केली. त्यावर पालकमंत्र्यांनी त्या नगरसेवकांना त्यांच्या कामांची यादी आयुक्तांकडे सादर करण्याचे आदेश दिले असून आपण स्वत: ही यादी अंतिम करू, असे स्पष्ट केले आहे.
शहरातील विकासकामे लवकरात लवकर व्हावी, यासाठी पालकमंत्री व भाजपा नगरसेवकांनी जिल्हा दौर्‍यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन १०० कोटींच्या निधीची मागणी केली होती. ती मान्य करून २५ कोटीचे नियोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार पालकमंत्र्यांनी नियोजन समितीच्या बैठकीत मनपा प्रशासनास महासभेत शासकीय ठराव मंजूर करून पाठविण्याची सूचना केली होती. मात्र मनपा महासभेत खाविआने आयत्यावेळच्या विषयात हा विषय मांडला. तसेच स्वत:च्या मर्जीने रस्त्यांच्या कामांचा समावेश केला. इतिवृत्त कायम झालेले नसतानाही ८४ कामांचे अंदाजपत्रक मनमानीपणे बनविण्यात आले व तसा ठराव मंजूर करण्यात आला. ज्यांच्या प्रयत्नामुळे २५ कोटीचा निधी मनपास प्राप्त होत आहे, ते मुख्यमंत्री फडणवीस व पालकमंत्री खडसे यांचा उल्लेख देखील यावेळी करण्यात आला नसल्याची तक्रार काही नगरसेवकांनी पालकमंत्र्यांकडे केली. त्यावर पालकमंत्र्यांनी या नगरसेवकांना त्यांच्या वॉर्डातील मुख्य रस्त्यांच्या कामांची यादी आयुक्तांकडे सादर करण्याची सूचना केली. तसेच शहरातील कोणती कामे करावयाची व कोणी नाही, ते आपण ठरविणार असल्याचे पालकमंत्र्यांनी या नगरसेवकांना सांगितले.

सोमवारी भाजपा नगरसेवकांची बैठक
या कामांच्या यादीसंदर्भात भाजपाच्या नगरसेवकांची बैठक सोमवारी मनपात घेण्यात येणार असल्याचे समजते.

Web Title: Corporator's complaint against 25 crore works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.