कोरोनाची भीती! सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, 'या' 5 देशांतून येणाऱ्यांसाठी RT-PCR आवश्यक! 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 01:05 PM2022-12-24T13:05:05+5:302022-12-24T13:59:00+5:30

Coronavirus : या देशांतील कोणत्याही प्रवाशाला कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास किंवा टेस्ट पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना तात्काळ क्वारंटाईन करण्यात येईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सांगितले आहे.

coronavirus india rt pcr test to be mandatory for international arrivals from china japan s korea hong kong thailand | कोरोनाची भीती! सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, 'या' 5 देशांतून येणाऱ्यांसाठी RT-PCR आवश्यक! 

कोरोनाची भीती! सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, 'या' 5 देशांतून येणाऱ्यांसाठी RT-PCR आवश्यक! 

Next

नवी दिल्ली : जगभरात पुन्हा एकदा कोरोनाची लाट (Coronavirus) पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार (Central Government) आणि राज्य सरकार (State Government) अलर्टवर असून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंडमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी आता आरटी-पीसीआर (RT-PCR) टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे. 

या देशांतील कोणत्याही प्रवाशाला कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास किंवा टेस्ट पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना तात्काळ क्वारंटाईन करण्यात येईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सांगितले आहे. तसेच, चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंडमधून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या आरोग्य स्थितीची माहिती देण्यासाठी कोविड-19 हवाई सुविधा फॉर्म भरणे बंधनकारक करण्यात आले आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय फ्लाइटमधून येणाऱ्या काही प्रवाशांची शनिवारपासून रँडम कोरोना व्हायरस टेस्ट केली जाईल. शुक्रवारी या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी करताना नागरी उड्डाण मंत्रालयाने सांगितले की, क्रू मेंबर्सना यासाठी निवडलेल्या प्रवाशांना विमानतळावरील स्क्रीनिंग सुविधेत आणावे लागेल. चीन आणि इतर अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमुळे सरकारने प्रत्येक फ्लाइटमधील एकूण प्रवाशांपैकी दोन टक्के प्रवाशांच्या आगमनानंतर विमानतळावर रँडम टेस्ट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

याचबरोबर, विमानतळ संचालकांना आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या रँडम टेस्टसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतील, असे मंत्रालयाने सांगितले आहे. तर मुंबई विमानतळाने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की, कोरोना व्हायरस टेस्टिंगसाठी सहा रजिस्ट्रेशन काउंटर आणि तीन सॅम्पलिंग बूथ तयार करण्यात आले आहेत. दरम्यान, गेल्या 24 तासांत म्हणजे देशात 201 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यासह देशात आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 4 कोटी 46 लाखांच्या पार गेली आहे. देशात सध्या 3,397 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी नवीन आकडेवारी जारी केली आहे.

प्रशासनाकडून तयारी, मार्गदर्शक सूचना जारी
जगभरात सध्या कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. भारतातही ओमायक्रॉनच्या BF.7 व्हेरिएंटचे चार रुग्ण आढल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. काही राज्यांनी मास्कसक्ती लागू केली आहे. देशात शुक्रवारी देशात कोरोनाचे 163 नवीन रुग्ण आढळले होते तर, कोरोनामुळे गेल्या 24 तासात 6 जणांना आपला जीव गमवावा लागला असून, त्यानंतर एकूण मृतांचा आकडा आता 5 लाख 30 हजार 690 वर पोहोचला आहे.

Web Title: coronavirus india rt pcr test to be mandatory for international arrivals from china japan s korea hong kong thailand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.