Corona Vaccination:लोक एकदा घ्यायला बघत नाहीत, या आजोबांनी तब्बल ११ वेळा घेतली कोरोनावरील लस, आता म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 06:28 PM2022-01-04T18:28:43+5:302022-01-04T18:29:34+5:30

Corona Vaccination in Bihar: कोरोना लसीबाबत वेगवेगळे दावे आणि माहिती समोर येत आहे. मात्र बिहारमधील मधेपुरा येथून समोर आलेली माहिती काहीशी वेगळी आहे. मधेपुरा येथील एका ८४ वर्षीय आजोबांनी आपण एक दोन नाही तर तब्बल ११ वेळा कोरोनाची लस घेतल्याचा दावा केला आहे.

Corona Vaccination: People don't want to take it once, this grandfather took the corona vaccine 11 times, now they say ... | Corona Vaccination:लोक एकदा घ्यायला बघत नाहीत, या आजोबांनी तब्बल ११ वेळा घेतली कोरोनावरील लस, आता म्हणतात...

Corona Vaccination:लोक एकदा घ्यायला बघत नाहीत, या आजोबांनी तब्बल ११ वेळा घेतली कोरोनावरील लस, आता म्हणतात...

Next

पाटणा - कोरोना लसीबाबत वेगवेगळे दावे आणि माहिती समोर येत आहे. मात्र बिहारमधील मधेपुरा येथून समोर आलेली माहिती काहीशी वेगळी आहे. मधेपुरा येथील एका ८४ वर्षीय आजोबांनी आपण एक दोन नाही तर तब्बल ११ वेळा कोरोनाची लस घेतल्याचा दावा केला आहे. या लसीमुळे आपल्याला अनेक फायदे झाल्याचा दावा या आजोबांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मधेपुरा जिल्ह्यातील उदाकिशुनगंज विभागांतर्गत पुरैनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओराय गावातील ब्रह्मदेव मंडल यांनी दावा केला आहे की, त्यांनी आतापर्यंत कोरोनाच्या लसीचे ११ डोस घेतले आहेत. एवढेच नाही तर या डोसमुळे मला खूप फायदा झाला आहे. त्यामुळे मी वारंवार डोस घेतो. काही दिवसांपू्र्वी ते लस घेण्यासाठी चौसा पीएचसी येथे गेले होते. मात्र तिथे लसीकरणाचे काम बंद झाल्याने ते लसीचा बारावा डोस घेऊ शकले नाहीत.

ब्रह्मदेव मंडल यांचे वय आधार कार्डवरील नोंदीनुसार ८४ वर्षे आहे. ते टपाल विभागात काम करायचे सध्या सेवानिवृत्तीनंतर गावातच वास्तव्यास आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी लसीचा पहिला डोस १३ फेब्रुवारी रोजी पुरौनी पीएससीमध्ये घेतला होता. त्यानंतर १३ फेब्रुवारीपासून ३० डिसेंबर २०२१ पर्यंत त्यांनी लसीचे ११ डोस घेतले होते. त्यांनी घेतलेल्या लसींची संपूर्ण माहिती टाइम आणि ठिकाण कागदावर नोंदवून ठेवले आहेत.

याबाबत ब्रह्मदेव मंडल यांनी सांगितले की, लस अमृतासारखी आहे. सरकारने ही खूप चांगली गोष्ट तयार केली आहे. मात्र काही लोक सरकारला बदनाम करण्याच्या प्रयत्नात आहेत. मी सर्वांना लस घेण्याचं आवाहन करतो. दरम्यान, ब्रह्मदेव यांनी केलेल्या दाव्यामुळे बिहारमधील लसीकरण मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आता आरोग्य विभाग याबाबत काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

Web Title: Corona Vaccination: People don't want to take it once, this grandfather took the corona vaccine 11 times, now they say ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.