काँग्रेसच्या नव्या इनिंगला सुरुवात, राहुल गांधी नवे कर्णधार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2017 11:47 AM2017-12-16T11:47:24+5:302017-12-16T12:00:33+5:30

राहुल गांधी यांनी अखेर काँग्रेस अध्यक्षपदाची सुत्रं स्विकारली आहेत. काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मुल्लापल्ले रामचंद्रन यांनी राहुल गांधींना अध्यक्षपदाचं प्रमाणपत्र देत, सूत्रं सोपवली.

Congress's new innings started, Rahul Gandhi takes charge as president | काँग्रेसच्या नव्या इनिंगला सुरुवात, राहुल गांधी नवे कर्णधार

काँग्रेसच्या नव्या इनिंगला सुरुवात, राहुल गांधी नवे कर्णधार

Next

नवी दिल्ली - राहुल गांधी यांनी अखेर काँग्रेस अध्यक्षपदाची सुत्रं स्विकारली आहेत. काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मुल्लापल्ले रामचंद्रन यांनी राहुल गांधींना अध्यक्षपदाचं प्रमाणपत्र देत, सूत्रं सोपवली. यावेळी माजी अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, यांच्यासह काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. 

अध्यक्षपद स्विकारल्यानंतर बोलताना राहुल गांधी यांनी भाजपावर टीका केली. 'एकदा आग लागल्यावर ती विझवणं फार कठीण, भाजपाचे लोक संपुर्ण देशात आग आणि हिंसा पसरवत आहेत. ही हिंसा रोखण्याती ताकद फक्त काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे. राजकारण जनतेसाठी आहे, पण आज राजकारणाचा उपयोग जनतेसाठी नाही, त्यांच्या विकासासाठी नाही तर त्यांना चिरडण्यासाठी होतो', अस राहुल गांधी म्हणाले आहेत. आगामी काळात काँग्रेसला 'ग्रँड ओल्ड अँड यंग पार्टी' बनवणार असल्याचंही राहुल गांधींनी यावेळी सांगितलं. तरुणांनो, एकत्र या, आपण एकतेचं, प्रेमाचं राजकारण करु असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.




राहुल गांधी आज अध्यक्षपदाचा पदभार स्विकारणार असल्याने काँग्रेसच्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. सलग 19 वर्ष पक्षाचं नेतृत्व करत अध्यक्षपद सांभाळणा-या सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर सोपवण्याचा निर्णय घेतला होता. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राहुल गांधी वगळता इतर कुणीही अर्ज न केल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली होती. काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मुल्लापल्ले रामचंद्रन यांनी 11 डिसेंबर रोजी राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली होती. तसंच राहुल गांधी बिनविरोध निवडल्याचं रामचंद्रन यांनी सांगितलं होतं. लोकसभा निवडणुकीपासून मरगळ आलेल्या पक्षाला पुन्हा एकदा ठाम उभं करण्याची जबाबदारी राहुल गांधींवर असणार आहे. 



 

राहुल गांधी काँग्रसचे अठरावे तर गांधी घराण्यातील सहावे अध्यक्ष
राहुल गांधी हे नेहरू-गांधी कुटुंबातून आलेले काँग्रेसचे सहावे अध्यक्ष आहेत. काँग्रेसच्या इतिहासात सोनिया गांधी याच सर्वाधिक काळ सलग 19 वर्ष पक्षाध्यक्ष राहिल्या आहेत. यापूर्वी या घराण्यातील मोतीलाल नेहरू, पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनीही काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी दोन वेळा अध्यक्षपदाची धूरा सांभाळली होती. राहुल गांधी आता सोनिया गांधी यांच्यानंतर अध्यक्ष होणारे घरातील सहावे अध्यक्ष असतील.

स्वातंत्र्यानंतरचे काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्यांचा कालावधी
1) आचार्य कृपलानी – 1947
2) पट्टाभी सितारामय्या – 1948-49
3) पुरुषोत्तमदास टंडन – 1950
4) जवाहरलाल नेहरु – 1951-54
5) यू. एन. धेबर – 1955-59
6) इंदिरा गांधी – 1959
7) नीलम संजीव रेड्डी – 1960–63
8) के. कामराज – 1964–67
9) निजलिंगअप्पा – 1968
10) जगजीवनराम – 1970–71
11) शंकर दयाळ शर्मा – 1972–74
12) देवकांत बरुआ – 1975-77
13) इंदिरा गांधी – 1978–84
14) राजीव गांधी – 1985–91
15) पी. व्ही नरसिंहराव – 1992–96
16) सिताराम केसरी – 1996–98
17) सोनिया गांधी – 1998 ते 2017
18) राहुल गांधी - 2017 पासून
 

Web Title: Congress's new innings started, Rahul Gandhi takes charge as president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.