राज्यसभेच्या १0 जागा काँग्रेस लढणार, सात जागी विजय निश्चित, तीन जागांसाठी पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 05:38 AM2018-03-06T05:38:20+5:302018-03-06T05:38:20+5:30

वेगवेगळ््या राज्यांत काँग्रेसच्या असलेल्या सदस्यांच्या संख्येनुसार केवळ सात जागांवरील उमेदवार राज्यसभेत निवडून येऊ शकतात. परंतु, काँग्रेस पक्षाने मात्र दहा जागांवर आमचे उमेदवार निवडून येऊ शकतात असा दावा केला आहे.

Congress will contest 10 seats in the Rajya Sabha, fight for seven seats, support for three seats | राज्यसभेच्या १0 जागा काँग्रेस लढणार, सात जागी विजय निश्चित, तीन जागांसाठी पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न

राज्यसभेच्या १0 जागा काँग्रेस लढणार, सात जागी विजय निश्चित, तीन जागांसाठी पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न

Next

- शीलेश शर्मा
नवी दिल्ली - वेगवेगळ््या राज्यांत काँग्रेसच्या असलेल्या सदस्यांच्या संख्येनुसार केवळ सात जागांवरील उमेदवार राज्यसभेत निवडून येऊ शकतात. परंतु, काँग्रेस पक्षाने मात्र दहा जागांवर आमचे उमेदवार निवडून येऊ शकतात असा दावा केला आहे.
पक्षाकडील एकूण आमदारांच्या संख्येचा विचार करता कर्नाटकातून तीन, महाराष्ट्रातून एक, गुजरातेतून दोन व मध्य प्रदेशातून एक उमेदवार निवडून येणे निश्चित आहे. याशिवाय काँग्रेस झारखंड, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये आपला एकेक उमेदवार मैदानात उतरवणार आहे. पक्ष सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसाZ झारखंडमधून अभिषेक मनु सिंघवी उमेदवार असू शकतात. कारण, झारखंड मुक्ती मोर्चाचा त्यांना नि़श्चितपणे ला पाठिंबा मिळणार आहे. बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाच्या पाठिंब्याने काँग्रेस एक उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. शक्यता अशी आहे की बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना झटका देण्यासाठी काँग्रेस राज्यात शरद यादव यांना पाठिंबा देऊ शकते. त्याचे कारण असे की, यादव यांचे राज्यसभेचे सदस्यत्व नितीश कुमार यांच्या सांगण्यावरून भाजपशी हातमिळवणी करीत रद्द केले गेले आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे.
पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस मार्क्सवादी पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांना पाठिंबा द्यायला तयार आहे. परंतु, माकपच्या पॉलिट ब्युरोची इच्छा काँग्रेसने माकपच्या पाठिंब्याने रिंगणात उतरणाºया अराजकीय अशा बुद्धीजीवी नेत्याला पाठिंबा द्यावा, अशी आहे.
माकपची ही इच्छा काँग्रेसला अजिबात मान्य नसल्यामुळे ती नाकारण्यात आल्याचे पक्ष सूत्रांनी सांगितले. आमचा पाठिंबा फक्त येचुरी यांना असेल अन्यथा आम्ही आमचा उमेदवार उभा करू, असे काँग्रेसने म्हटले आहे.
काँग्रेस आपल्या उमेदवाराला पश्चिम बंगालमधून निवडून आणण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसशी मैत्री करून अतिरिक्त मते मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. अशाच रितीने कर्नाटकातून तीन, महाराष्ट्रातून एक, गुजरातेतून दोन, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार व झारखंडमधून प्रत्येकी एका उमेदवाराला राज्यसभेत काँग्रेसच्या तिकिटावर पाठवण्याचे गणित पक्षाने तयार केले आहे.
पुढील महिन्यात राज्यसभेच्या ५५ सदस्यांची मुदत पूर्ण होत आहे, काही जण पुन्हा राज्यसभेवर निवडले जाऊ शकतात. उमेदवार कोण असतील हे पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी लवकरच निश्चित करणार आहेत.

Web Title: Congress will contest 10 seats in the Rajya Sabha, fight for seven seats, support for three seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.