"काँग्रेस-राष्ट्रवादीचं मिशन 20-ट्वेंटी, प्रकाश आंबेडकरांची होणार एन्ट्री"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 01:49 PM2019-02-05T13:49:50+5:302019-02-05T14:18:38+5:30

युती आणि आघाड्यांच्या जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्यात आहेत.

Congress-NCP's mission will be 20-T, Prakash Ambedkar's entry-formula | "काँग्रेस-राष्ट्रवादीचं मिशन 20-ट्वेंटी, प्रकाश आंबेडकरांची होणार एन्ट्री"

"काँग्रेस-राष्ट्रवादीचं मिशन 20-ट्वेंटी, प्रकाश आंबेडकरांची होणार एन्ट्री"

ठळक मुद्देमहाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये प्रत्येकी 20-20 जागा लढवण्यावर जवळपास एकमत झालं आहे.प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला 8 जागा सोडण्याचं काँग्रेस-राष्ट्रवादीचं जवळपास निश्चित केलं आहे.चार जागा काँग्रेस आणि चार जागा राष्ट्रवादीनं प्रकाश आंबेडकरांसाठी सोडण्यास तयारी दाखवली आहे.

मुंबईः महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. युती आणि आघाड्यांच्या जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्यात आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये प्रत्येकी 20-20 जागा लढवण्यावर जवळपास एकमत झालं आहे. तसेच प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला 8 जागा सोडण्याचं काँग्रेस-राष्ट्रवादीचं जवळपास निश्चित केलं आहे. त्यातील चार जागा काँग्रेस आणि चार जागा राष्ट्रवादीनं प्रकाश आंबेडकरांसाठी सोडण्यास तयारी दाखवली आहे.

2019च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी केल्यास त्यांच्या 6 जागा निवडून येण्याचा अंदाजही वर्तवला जात आहे. परंतु भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे 20 जागांची मागणी केली आहे. 2014 मध्ये 26:22 असा फॉर्म्युला ठरला होता. मात्र हातकणंगलेमध्ये राष्ट्रवादीला उमेदवारच न मिळाल्याने ती जागा अखेर काँगेसने लढवली होती. म्हणजेच गेल्या निवडणुकांत काँगेस 27 तर राष्ट्रवादी 21 जागांवर लढली होती. रायगड आणि हिंगोलीच्या जागांची तेव्हा अदलाबदल करण्यात आली होती. महाराष्ट्राचा भौगोलिक आणि सामाजिक इतिहास हा गरीब मराठा, आदिवासी, ओबीसी, दलित, बहुजन, मुस्लिम, धनगर समाजांची मोट बांधून सत्तेच्या टापूला धक्का देणारा आहे. हा वंचित समाज निर्णायक ठरू शकतो, याची पुरेपूर कल्पना अ‍ॅड. आंबेडकर यांना आहे.

तर कालच प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांत आम्ही स्वतंत्र उमेदवार देऊ, असंही जाहीर केलं होतं. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता. काँग्रेसची महाराष्ट्रात अजिबात ताकद राहिलेली नाही. काँग्रेसकडे चांगला चेहराच नाही. मुंबई, ठाणे आणि पुण्यात काँग्रेसकडे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारही नाहीत. काँग्रेसचे अनेक नेते भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले आहेत. रॉबर्ट वड्रा, चिदंबरम हे भ्रष्टाचारात गुरफटलेले आहेत. अशोक चव्हाणही त्याच प्रकारातील नेते आहेत. काँग्रेसनं मुकाट्यानं आम्हाला पाठिंबा द्यावा, काँग्रेस कोणत्याही अटी आणि शर्थी ठेवण्याच्या स्थितीत नाही, अशी टीकाही काँग्रेसवर केली होती. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष नव्हे, तर गल्लीबोळातला झाल्याची टीकाही त्यांनी केली होती. 

Web Title: Congress-NCP's mission will be 20-T, Prakash Ambedkar's entry-formula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.