भाजपाने राजीव गांधींना म्हटले, 'फादर ऑफ मॉब लिंचिंग' 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 08:26 PM2018-08-28T20:26:43+5:302018-08-28T20:31:07+5:30

भाजपा प्रवक्ते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी बॅनर लावल्याने राजकीय वाद उफाळून आला आहे. तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी दिल्लीत प्रमुख चौकांसह भाजपाच्या मुख्यालयाबाहेर बॅनर लावले आहेत.

congress hits back at bjp with poster by mumbai congress | भाजपाने राजीव गांधींना म्हटले, 'फादर ऑफ मॉब लिंचिंग' 

भाजपाने राजीव गांधींना म्हटले, 'फादर ऑफ मॉब लिंचिंग' 

Next

नवी दिल्ली : भाजपा प्रवक्ते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी बॅनर लावल्याने राजकीय वाद उफाळून आला आहे. तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी दिल्लीत प्रमुख चौकांसह भाजपाच्या मुख्यालयाबाहेर बॅनर लावले आहेत. यामध्ये माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांना 'फादर ऑफ मॉब लिंचिंग' म्हटले आहे. यावरुन राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. 

वादग्रस्त वक्तव्यावरुन नेहमीच चर्चेत राहणाऱ्या तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन दिल्लीत लावलेल्या बॅनरचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे, 'होय, राजीव गांधी फादर ऑफ मॉब लिंचिंग होते'.




तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी लावलेल्या बॅनरवरुन काँग्रसचे प्रवक्ता प्रणव झा यांनी ट्विटर अकाउंटवरुन भाजपावर निशाणा साधला आहे. मुंबई काँग्रेसने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहणारा बॅनर लावला होता. त्या बॅनरचा फोटो पोस्ट करत प्रणव झा यांनी भाजपावर टीका केली आहे. 'भाजपा, तुमच्यामध्ये आणि काँग्रेसमध्ये किती फरक आहे, पाहा. काही वेळ वाट पाहा. जनता तुमच्या अहंकाराला आणि तिरस्काराला योग्य उत्तर देईल. संस्कारांचा फरक', असे प्रणव झा यांनी ट्विटरवर म्हटले आहे.


दुसरीकडे, काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही भाजपावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे.   



 

Web Title: congress hits back at bjp with poster by mumbai congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.