थंडीच्या लाटेमुळे संपूर्ण उत्तर भारत गारठला!अनेक ठिकाणी हुडहुडी; काश्मीरच्या ब-याच भागांत शून्याखाली तापमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 12:12 AM2017-12-24T00:12:39+5:302017-12-24T00:12:57+5:30

काही दिवसांच्या ऊबदारपणानंतर काश्मीर खोरे आणि लडाखमध्ये पुन्हा एकदा थंडीची लाट पसरली आहे. बहुतांश ठिकाणी पारा शून्याच्या खाली उतरला आहे. केवळ काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंडच नव्हे, तर सर्व उत्तर भारतात थंडीची लाट आहे.

Cold wave sweeps entire northern India due to the cold wave; Hudhudi in many places; Temperatures below zero in many parts of Kashmir | थंडीच्या लाटेमुळे संपूर्ण उत्तर भारत गारठला!अनेक ठिकाणी हुडहुडी; काश्मीरच्या ब-याच भागांत शून्याखाली तापमान

थंडीच्या लाटेमुळे संपूर्ण उत्तर भारत गारठला!अनेक ठिकाणी हुडहुडी; काश्मीरच्या ब-याच भागांत शून्याखाली तापमान

Next

श्रीनगर : काही दिवसांच्या ऊबदारपणानंतर काश्मीर खोरे आणि लडाखमध्ये पुन्हा एकदा थंडीची लाट पसरली आहे. बहुतांश ठिकाणी पारा शून्याच्या खाली उतरला आहे. केवळ काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंडच नव्हे, तर सर्व उत्तर भारतात थंडीची लाट आहे. त्यामुळे ख्रिसमस व नवे वर्ष तिथे कडाक्याच्या गारठ्यामध्येच साजरे केले जाणार आहे.
उत्तर प्रदेश, हरयाणा, दिल्ली, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश तसेच पंजाबमध्येही दोन दिवसांपासून कडाक्याची थंडी पडली आहे. हवामान खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, राजधानी श्रीनगर शहरातील तापमान काल रात्री तीन डीग्रीने उतरून उणे २.१ डीग्री सेल्सिअस होते. त्याआधी शुक्रवारी रात्री ते २.३ डीग्री सेल्सिअस होते. दक्षिण काश्मिरातील काझिगुंड येथील तापमान उणे १.0 डीग्री सेल्सिअस झाले. आदल्या रात्री ते ३.0 डीग्री सेल्सिअस होते.
कोकेरनाग येथील तापमान २.७ डीग्री सेल्सिअसवरून शून्यावर आले. उत्तर काश्मिरातील कुपवाडा येथील तापमान उणे २.२ डीग्री सेल्सिअस झाले. आदल्या रात्रीच्या तुलनेत ते २ डीग्रीने उतरले आहे. अमरनाथ यात्रेचा आधार तळ असलेल्या पहलगाममध्ये उणे ५.९ डीग्री सेल्सिअस तापमान राहिले. लडाख विभागातील लेह शहरातील तापमान १३.१ डीग्री सेल्सिअस नोंदले गेले. आदल्या रात्रीच्या तुलनेत येथील पारा चार डीग्रीने उतरला आहे. (वृत्तसंस्था)

कारगिलमध्ये उणे १५, गुलमर्गमध्ये पर्यटकांची गर्दी
कारगिल हे जम्मू-काश्मीर राज्यातील सर्वांत थंड ठिकाण ठरले आहे. तेथील रात्रीचे तापमान उणे १५.२ डीग्री सेल्सिअस इतके आहे. प्रसिद्ध गुलमर्ग हे उणे ७ डीग्री सेल्सियस तापमानासह काश्मीर खोºयातील सर्वांत थंड ठिकाण ठरले आहे. गुलमर्गमध्ये थंडीत शेकडो पर्यटक जात असतात. आताही तिथे तसेच पत्नी टॉप या दोन ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली आहे.

Web Title: Cold wave sweeps entire northern India due to the cold wave; Hudhudi in many places; Temperatures below zero in many parts of Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.