ब्यूटी विद ब्रेन! कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 22 वर्षीय चंद्रज्योती झाली IAS

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 04:34 PM2024-01-19T16:34:24+5:302024-01-19T16:34:49+5:30

चंद्रज्योती ही रिटायर्ड कर्नल दलबीर सिंह आणि लेफ्टिनेंट कर्नल मीना सिंह यांची मुलगी आहे.

cleared upsc in first attempt without coaching success story ias chandrajyoti | ब्यूटी विद ब्रेन! कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 22 वर्षीय चंद्रज्योती झाली IAS

ब्यूटी विद ब्रेन! कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 22 वर्षीय चंद्रज्योती झाली IAS

यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा ही संपूर्ण देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. फार कमी लोक यामध्ये यशस्वी होतात. काही तरी करून दाखवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी चंद्रज्योती सिंह ही प्रेरणादायी ठरत आहे. तिने घवघवीत यश मिळवलं आहे. चंद्रज्योतीचा आयएएस होण्याचा प्रवास खरोखरच आश्चर्यकारक आहे. तिच्यामुळे अनेकांना आता प्रेरणा मिळणार आहे. 

चंद्रज्योती ही रिटायर्ड कर्नल दलबीर सिंह आणि लेफ्टिनेंट कर्नल मीना सिंह यांची मुलगी आहे. पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण करून दमदार कामगिरी करणाऱ्या अशा काही लोकांपैकी चंद्रज्योती एक आहे. शिस्त आणि प्रेरणेने भरलेल्या वातावरणात वाढलेल्या चंद्रज्योतीच्या पालकांनी तिच्यामध्ये लहानपणापासूनच कठोर परिश्रम आणि समर्पणाची मूल्ये रुजवली. 

चंद्रज्योतीची अभ्यासातील कामगिरीही अप्रतिम होती. तिने जालंदरच्या एपीजे स्कूलमधून इयत्ता दहावीमध्ये पूर्ण 10 CGPA मिळवले आणि नंतर भवन विद्यालय, चंदीगड येथून 95.4% उत्कृष्ट गुणांसह 12वी उत्तीर्ण झाली. 2018 मध्ये सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून हिस्ट्री ऑनर्ससह पदवीधर होऊन मोठं स्वप्न पाहिलं. पदवीनंतर चंद्रज्योतीने एक वर्षाचा ब्रेक घेतला आणि 2018 मध्ये UPSC ची तयारी सुरू केली. 

कठोर परिश्रम करण्याची तयारी आणि कधीही हार न मानण्याच्या भावनेने, तिने केवळ यूपीएससी उत्तीर्णच नाही तर ऑल इंडिया रँक 28 मिळवून जबरदस्त कामगिरी केली. वयाच्या 22 व्या वर्षी चंद्रज्योती सिंह हिने आयएएस अधिकारी म्हणून प्रतिष्ठित पद स्वीकारलं. तिची यशोगाथा आता असंख्य UPSC इच्छुकांसाठी प्रेरणास्रोत आहे, दृढनिश्चय आणि उत्तम प्लॅनिंगमुळे UPSC परीक्षेत यश मिळवता येतं हे सिद्ध केलं आहे. 

Web Title: cleared upsc in first attempt without coaching success story ias chandrajyoti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.